Categories: Uncategorized

स्मशानभूमीमध्ये ध्वनीक्षेपक यंत्रणा बसविण्याची महापौरांची मागणी

सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये दिघा ते सीबीडी बेलापूर परिसरात २६ मध्यवर्ती स्मशानभूमी असून त्याठिकाणी अंत्यसंस्काराप्रसंगी दिवंगत व्यक्तीला श्रद्धांजली अर्पण करताना अनेकदा मोठया संख्येने नागरिक उपस्थित असल्याने ध्वनीक्षेपक यंत्रणेची गरज भासते. त्यानुसार स्मशानभूमीत ध्वनीक्षेपक यंत्रणेची सुविधा असावी याकरीता नागरिकांकडून सतत मागणी होत असते. या अनुषंगाने नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी सर्व स्मशानभूमींमध्ये ध्वनीक्षेपक यंत्रणेची सुविधा करणेबाबत महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना सूचीत केले आहे.   

अंत्यसंस्कारांच्या वेळी उपस्थित मान्यवर व नागरिकांकडून दिवंगताविषयी आठवणी सांगितल्या जातात, श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले जाते. विशेषत्वाने ग्रामीण भागातील व्यक्ती दिवंगत झाल्यानंतर पार्थिवावर अंतिम संस्कार होत असताना ग्रामस्थांकडून भजन केले जाते. नवी मुंबई महानगरपालिकेची ओळख अत्याधुनिक शहर केली जाते. त्या दृष्टीने येथील स्मशानभूमीही अद्ययावत आहेत. त्याठिकाणी मोफत अंत्यसंस्काराची सुविधा महानगरपालिकेच्या वतीने पुरविली जाते. हे बघता या स्मशानभूमी अधिक आधुनिक व्हाव्यात यादृष्टीने नागरिकांच्या मागणीनुसार याठिकाणी ध्वनीक्षेपक यंत्रणा असण्याची गरज लक्षात घेऊन याविषयी कार्यवाही करण्याचे महापौर जयवंत सुतार यांनी सूचीत केले आहे. 

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago