Categories: Uncategorized

आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा – आ.सौ.मंदाताई म्हात्रे

नवी मुंबई : “आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा” हे ब्रीदवाक्य जपत नवी मुंबईतील नागरिकांनी आरोग्यासाठी थोडा वेळ व्यायामासाठी द्यावा, यासाठी बेलापूर विधानसभेच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीतून नेरूळ सेक्टर-२ छत्रपती संभाजी महाराज उद्यान व सेक्टर-४ येथील नेताजी सुभाषचंद्र बोस उद्यान येथे ओपन जिमचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. सदर दोन्ही ओपन जिमचे लोकार्पण स्थानिक ज्येष्ठ नागरिक महिलांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी नवी मुंबई भाजपा युवती अध्यक्ष सुहासिनी नायडू, युवा महामंत्री रणजीत नाईक, सेवा विकास संयोजक ऑड्रे मोराईस, सुवर्णा होसमानी, अक्षय शिरगावकर तसेच असंख्य ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग उपस्थित होते.
आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, रोजच्या कुटुंबाच्या धावपळीत अनेक महिला तसेच ज्येष्ठ नागरिक स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे महिलांचे आरोग्य अधिक बिघडत चालले आहे. त्यात प्राणायाम, व्यायाम करण्याची       इच्छा असतानाही घरापासून या सुविधा लांब असल्याने महिलांचे व ज्येष्ठ नागरिकांचे जाणे होत नाही. त्यामुळे घराच्या         परिसरातच उद्यानामध्ये खुल्या व्यायामशाळांची (ओपन जिम) ची तेथील स्थानिक नागरिकांची मागणी होती. याच अनुषंगाने  व्यायाम साहित्य उपलब्ध केल्यास त्याचा उपयोग करता येईल या विचारातून बेलापूर विधानसभा क्षेत्रात माझ्या आमदार        निधीचा वापर करत ओपन जिम उभारण्यात आले आहेत. यापूर्वीही विविध उद्यानात एकूण २२ ओपन जिमचे लोकार्पण करण्यात आले आहे. व्यायामाचे अत्याधुनिक साहित्य बसविण्यात आले असून त्यामध्ये सायकलिंग, एअर वाकॅर्स, रोईंग, चेस्ट प्रेस या साहित्यांचा समावेश आहे. त्याच्या साहाय्याने सर्व प्रकारचा व्यायाम करणे आता शक्य होणार आहे. त्यामुळे सकाळी व       सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी उद्यानांमध्ये येणाऱ्या नागरिकांचा खुल्या व्यायामशाळांकडे ओढा वाढला असून त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसोबतच तरुणाईही मोठय़ा संख्येने दिसून येत आहे. विशेष म्हणजे ताणतणाव, वाढलेले वजन यातून मुक्ती मिळण्यासाठी महिलाही खुल्या व्यायामशाळांकडे वळल्याचे चित्र पाहावयास मिळते. या परिसरातील सर्व नागरिकांनी            उपक्रमाचे कौतुक करत रोज व्यायामशाळेत येण्याचा निर्धार व्यक्त केला असून  परिसरातील स्थानिक ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग यांचा आनंद पाहून समाधान वाटत असल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
 
NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago