Categories: Uncategorized

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करण्याची मागणी समाजसेवक व भाजपाचे स्थानिक कार्यकर्ते पांडुरंग विठ्ठल आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

नवी मुंबई शहरात पुन्हा एकवार कोरोना महामारी हा साथीचा आजार डोके वर काढू लागला आहे. १६ मार्च २०२१ रोजी महापालिकेकडून प्रसिध्द करण्यात आलेल्या आकडेवारीत कोरोना रूग्णांचा आकडा २२५ आहे. त्यामुळे कोरोनाचा निर्माण होवू पाहणारा उद्रेक कोठेतरी संपुष्ठात येणे आता आवश्यक आहे. महापालिका प्रभाग ७६ मध्ये सानपाडा या परिसराचा समावेश होत आहे. नागरी आरोग्य केंद्र  व माता बाल रूग्णालयात कोरोना चाचणीचा पर्याय उपलब्ध असला तरी प्रभागात तसेच गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात पालिका प्रशासनाने लवकरात लवकर अॅंण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करणे आवश्यक आहे. लोकांना सोसायटीच्या आवारातच कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध झाली तर लोक स्वत:हून चाचणी करून  घेतील. प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करण्यात यावे, तसेच गृहनिर्माण सोसायटीच्या आवारातही ही शिबिरे लवकरात लवकर आयोजित करण्याची मागणी समाजसेवक  पांडुरंग आमले यांनी केली आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago

सारसोळेच्या खाडीत बामणदेवाचा भंडारा उत्साहात

नवी मुंबई : नवसाला पावणारा व भाविकांच्या हाकेला धावून जाणारा अशी नवी मुंबई, ठाणे-रायगड  पट्टीत…

3 years ago