Categories: Uncategorized

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश 

आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   
पनवेल : महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंगळवारी (दि. १६) शासनाच्या नगरविकास खात्याने मंजुरी दिली आहे. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी मागणी करून सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने त्यांच्या मागणी आणि पाठपुराव्याला यश आले आहे. आकृतिबंध आराखड्या संदर्भात सातत्याने शासनाकडे मागणी व सतत पाठपुरावा करीत विधिमंडळाच्या अधिवेशनातही आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करून याकडे शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानुसार आकृतिबंध आराखडा मंजूर झाला आहे. 
आकृतिबंधानुसार विविध विभागांतील ६५० नवीन पदांना मंजुरी मिळाल्याने पनवेल महानगरपालिकेत एकूण १०४२ पदे मंजूर झाली आहेत. २३ ग्रामपंचायतींमधील एकूण २८८ कर्मचार्‍यांचे विविध पदांवर समावेशन करण्यासाठी विविध पदे निर्मितीस ही मान्यता देण्यात आली आहे. 
पनवेल महापालिका ही ‘ड’ वर्ग महापालिका आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार महापालिकेची लोकसंख्या १० लाख असून, तरंगती लोकसंख्या १३ लाख आहे. सद्यस्थितीत मालमत्ताधारकांची संख्या ३. ५ लाख आहे. महापालिकेच्या आस्थापनेवर यापूर्वी ३३ संवर्गातील ४२ पदांना मंजुरी देण्यात आली होती. आयुक्तांनी प्रमाणित केल्यानुसार आस्थापनेवर ३९३ पदे अस्तित्वात आहेत. पनवेलची वाढती लोकसंख्या व वाढते नागरीकरण शासनाच्या आरोग्याशी निगडीत व विकासाच्या योजनांच्या अनुषंगाने वाढलेले काम विचारात घेऊन विविध संवर्गातील ६५० वाढीव पदांना मंजुरी देण्यात आली आहे.
पनवेल महापालिकेच्या आस्थापना खर्चाची टक्केवारी व महसुली उत्पन्न लक्षात घेऊनच ही पदे भरणे अनिवार्य असेल. पनवेल महापालिका अंतर्गत प्रशासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचारी, तांत्रिक व लेखा सेवेतील पदांवर बदलीने प्रतिनियुक्ती करता येणार नाही. ज्या सेवा बाह्य स्रोताद्वारे करणे शक्य आहे व अशा आवश्यक सेवा बाह्य स्रोताद्वारे पुरविण्यात याव्यात, जेणेकरून अशा पदांचा वेतन इत्यादीचा खर्च कायमस्वरुपी आर्थिक भार महापालिकेच्या आस्थापना खर्चावर होणार नाही.  पनवेल महापालिका स्थापनेपूर्वी अस्तित्वात असलेल्या तत्कालीन २३ ग्रामपंचायतींतीमधील एकूण २८८ कर्मचार्‍यांचे विविध पदांवर समावेशन करण्यासाठी विविध पदे निर्मितीस ही मान्यता देण्यात आली आहे. 

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago

सारसोळेच्या खाडीत बामणदेवाचा भंडारा उत्साहात

नवी मुंबई : नवसाला पावणारा व भाविकांच्या हाकेला धावून जाणारा अशी नवी मुंबई, ठाणे-रायगड  पट्टीत…

3 years ago