Categories: Uncategorized

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत?

फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती.

मुंबई : अँटिलियासमोरील स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याचे प्रकरण व हिरेन मृत्यू प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते बेफामपणे कोणत्याही पुराव्याशिवाय महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर आरोप करत आहेत. आता एनआयएने जप्त केलेल्या मर्सिडीस गाडीतून १७ फेब्रुवारी रोजी मनसुख हिरेन यांनी प्रवास केला होता असे म्हटले जाते. सदर गाडीबरोबर एका फोटोत ठाणे भाजपाचा पदाधिकारी दिसत आहे. त्याबद्दल भाजपाने तात्काळ स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. त्याचबरोबर सीडीआर संदर्भातील माहिती तपास यत्रणांना न देऊन तसेच सीडीआर कोणी दिला हे न सांगून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी घालत आहेत, असा घणाघाती आरोप सावंत यांनी करून फडणवीस यांनी या गुन्ह्यात सहभागी होऊ नये अशी विनंतीही केली.

यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, हिरेन मृत्यू प्रकरणातून सरकार अस्थिर करण्याचा राजकीय उद्देश साध्य करण्यापायी भाजपा नेते बेफामपणे कोणत्याही पुराव्याशिवाय आरोप करत सुटले आहेत. यातून भाजपा नेत्यांचा बेजबाबदारपणा पूर्णपणे दिसून आला आहे. या प्रकरणातील सीडीआर आपल्याकडे आहे, असे फडणवीस यांनी विधीमंडळात जाहीर केले होते. सीडीआर मिळवणे हा एक अपराध आहे आणि स्वतः वकील तसेच माजी गृहमंत्री राहिलेल्या फडणवीस यांना याची पूर्ण माहिती आहे परंतु सदर सीडीआर अद्यापही त्यांनी तपास यंत्रणांना दिला नाही. हिरेन प्रकरणातील दोषी पकडण्यासाठी सदर माहितीचा उपयोग झाला असता. यातून दोषीला पाठीशी घालण्याचा त्यांचा उद्देश आहे का ?

कर्नाटक उच्च न्यायालयाने १५ मार्च २०२१ रोजी अत्यंत महत्वपूर्ण निकाल दिला. या निकालात न्यायालयाने म्हटले आहे की, एखाद्या आरोपीची वैयक्तिक माहिती त्यामध्ये सीडीआरही आला, न्यायालयाच्या परवानगीशिवाय तिसऱ्या व्यक्तीला कोणाही अधिकाऱ्याने दिली तर त्याला दोषी ठरवलं जाईल. फडणवीसांना ती माहिती कोणी दिली हे न सांगून अशा अपराधी अधिकाऱ्यालाही ते पाठीशी घालत आहेत. त्यामुळे गुन्ह्यामध्ये सहभागी होऊ नका अशी विनंती काँग्रेसतर्फे सचिन सावंत यांनी केली. तसेच १७ फेब्रवारीला मनसुख हिरेन ज्या मर्सिडीस गाडीतून फिरले ती गाडी एनआयएने जप्त केली आहे. सदर गाडीबरोबर ठाणे जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्याचा फोटो आहे. बेछूटपणे आरोप करणाऱ्या भाजपाने या कनेक्शनबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी सावंत यांनी केली.    

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago

सारसोळेच्या खाडीत बामणदेवाचा भंडारा उत्साहात

नवी मुंबई : नवसाला पावणारा व भाविकांच्या हाकेला धावून जाणारा अशी नवी मुंबई, ठाणे-रायगड  पट्टीत…

3 years ago