Categories: Uncategorized

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

 

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या काही दिवसापासून वर्तविण्यात येत आहे. कोरोनाग्रस्तांची वाढती आकडेवारी पाहता कोरोनाची दुसरी लाट महाभयावह राहणार असल्याचे वातावरण निर्माण होण्यास सुरूवात झाली आहे. नवी मुंबईत कोरोना आज उद्रेकाच्या उंबरठ्यावर येवून पोहोचला आहे. बुधवार, दि. १७ मार्च रोजी महापालिका प्रशासनाकडून प्रकाशित झालेल्या आकडेवारीनुसार ३१८ नवी मुंबईकरांना कोरोनाची नव्याने लागण झाली असून ३  कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. तर १३५ कोरोनाग्रस्त  कोरोनामुक्त  होवून घरी परतले आहेत.

आजच्या ३१८ कोरोनाग्रस्तांमध्ये वाशी विभागात सर्वाधिक म्हणजे ५३ कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. बेलापुर विभागात कोरोनाचे ४४ रूग्ण, नेरूळ विभागात कोरोनाचे ४३ रूग्ण, तुर्भे विभागात कोरोनाचे ३७ रूग्ण, कोपरखैराणे विभागात कोरोनाचे ५२ रूग्ण, घणसोली विभागात कोरोनाचे ४१ रूग्ण, ऐरोली विभागात कोरोनाचे ४५ रूग्ण तर दिघा विभागात ३ कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत.

आज ७५२ नवी मुंबईकरांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रॅपिड अॅंण्टीजेन टेस्ट करून घेतली. आजवर ३ लाख १५ हजार १८३ लोकांनी ही टेस्ट करून घेतली आहे तर ५ लाख ९० हजार ९२३ लोकांनी आजवर कोव्हिड १९ चाचणी आजवर करून घेतली आहे. कोरोनाने आज तीनशेचा आकडा ओलांडताच नवी मुंबईकरांचा खऱ्या अर्थाने काळजाचा ठोका चुकला आहे. सार्वजनिक जागी वाढलेली गर्दी, मार्जिनल स्पेस तर सोडा मार्जिनल स्पेससमोरील पदपथावरही  दुकानचालकांचे अतिक्रमण, ग्राहकांसह दुकानमालक विना मॉस्क करत असलेले व्यवहार, पदपथावर गृहनिर्माण  सोसायट्यांच्या कचराकुंड्यांची दुर्गंधी, स्वच्छतेबाबत आयुक्तांच्या सूचनांना पालिका अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनीच दाखविलेली केराची टोपली यामुळे कोरोनाग्रस्तांची आकडेवारी वाढत चालली आहे. आजची आकडेवारी ‘अब की बार तीनसौ पार, कोरोनाच्या उद्रेक पोहोचला  आता शहराच्या कानाकोपऱ्यात’ ही भीती  आता नवी मुंबईकरांच्या चेहऱ्यावर उघडपणे पहावयास मिळू लागली आहे.

NaviMumbaiLiveStaff

Share
Published by
NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago

सारसोळेच्या खाडीत बामणदेवाचा भंडारा उत्साहात

नवी मुंबई : नवसाला पावणारा व भाविकांच्या हाकेला धावून जाणारा अशी नवी मुंबई, ठाणे-रायगड  पट्टीत…

3 years ago