Categories: Uncategorized

सिडको प्रदर्शन सभागृहातील कोव्हिडं रुग्णालय अपूर्णच!

नवनियुक्त मनपा आयुक्तांनी पाहणी केल्यानंतर झाले स्पष्ट

दिपक देशमुख

नवी मुंबई : मनपाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्चून नव्याने तात्पुरत्या स्वरूपात निर्माण करण्यात आलेले सिडको प्रदर्शन सभागृहामधील कोव्हिडं रुग्णालयातील सोयीसुविधा या अपूर्णच आहे. हे नवनियुक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी पाहणी केल्यानंतर ज्या प्रकारे सोयी सुविधा निर्माण करण्याचे आदेश दिले. यावरून स्पस्ट होत आहे. यामुळे कोव्हिडं रुग्णालय निर्माण करताना भ्रष्टाचार झाला नाही ना? अशा प्रकारची शंका व्यक्त होऊ लागली आहे.यामुळे  नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे.

नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत कोरोनाच्या संसर्गाचा चांगलाच फैलाव झाला म्हणून युद्ध पातळीवर वाशी येथील सिडको प्रदर्शन सभागृहात ११३२ बेडसचे सर्व सोयीसुविधा युक्त असे कोव्हिड रुग्णालय ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने सुरू करण्यात आले.या रुग्णालयाचे काम पूर्ण झाले म्हणून स्वतः आरोग्य मंत्री राजेश टोपे,पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार राजन विचारे यांच्या हस्ते ९ जून रोजी उदघाटन करण्यातही आले होते. परंतु त्यानंतर या कोव्हिड रुग्णालयात रुग्ण गेल्यानंतर ज्या प्रकारे  रुग्णाना त्रास होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर रुग्णालय अपूर्ण असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर या अशा अनेक कारणांमुळे तत्कालीन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची बदली झाली.

तत्कालीन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची बदली झाल्यानंतर नव्या दमाचे तरुण आयुक्त अभिजित बांगर आल्यानंतर त्यांनी कोव्हिडं रुग्णालयाची पाहणी केली. त्या पाहणीत त्यांना कोव्हिडं रुग्णालयात अनेक अडचणी असल्याच्या निदर्शनास आल्या. त्यामध्ये जरी सध्या स्थितीत ५०० बेडसना ऑक्सिजन व्यवस्था करण्यात आली असली तरी त्या कमी पडत आहेत. म्हणून अजून ५०० ऑक्सिजन बेडस तयार करावेत असे आदेश आयुक्त बांगर यांनी दिले. तसेच महत्वाचे म्हणजे कोरोना बधितांना अत्यावश्यक असणारा अतिदक्षता विभागच येथे नसल्याने येथे आढळून आले. त्यामुळे १०० बेडसचे अतिदक्षता विभाग सुरू करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.यावरून कोव्हिडं रुग्णालयाचा फक्त साचा तयार करून पालकमंत्री व तत्कालीन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी काय सध्या केले असा सवाल नागरिक विचारत आहेत.

  • पाहणी दिखाव्यासाठीच का?

कोव्हिडं रुग्णालयाचे काम चालू असताना खुद्द पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मनपा अधिकाऱ्यांसमवेत अनेकदा पाहणी केली. पण अधिकारी व कर्मचारी भरती,यंत्रणा उभारण्यास प्रशासन व लोकप्रतिनिधींना अपयश आल्याने नागरिकांच्या माथी फक्त त्रासच आल्याने नागरिकांच्या मनात कमालीचा रोष निर्माण झाला आहे.त्यामुळे गरीब व गरजू नागरिकाना खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागल्याने त्यांना नाहक भुर्दंड बसला व वेळप्रसंगी घर व सोने तारण ठेऊन मानसिक त्रासच सहन करावे लागला.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago