Categories: Uncategorized

प्रभाग ९६ मधील नागरी समस्यांबाबत गणेश भगतांचे पालिका आयुक्तांना साकडे

सुवर्णा खांडगेपाटील

नवी मुंबई : नेरूळ नोडमधील प्रभाग ९६ मधील नागरी समस्या सोडविण्यासाठी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना जनसेवक गणेश भगत यांनी लेखी निवेदनातून साकडे घालताना समस्यांचे गांभीर्य जाणून घेण्यासाठी प्रभागात पाहणी अभियान राबिण्याचाही गणेश भगत यांनी आग्रह धरला आहे.
प्रभाग ९६, नेरूळ नोडमधील एक प्रभाग, येथील नागरी समस्या सोडविण्यासाठी व नागरी सुविधा मिळविण्यासाठी आमच्या घरातील चारही सदस्य पालिका विभाग कार्यालय, पालिका मुख्यालय या ठिकाणी आमच्या चपला व तुमचे उंबरे झिजविण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून करत आहोत. दुर्देवाने आम्हाला पालिका प्रशासनाकडून पाहिजे तसे सहकार्य मिळत नसल्याची खंत यानिमित्ताने व्यक्त करावीशी वाटते. नागरि समस्या सोडविण्यासाठी आम्हाला लेखी पाठपुरावा मोठ्या प्रमाणावर करावा लागतो. संबंधितांच्या सतत भेटीगाठी घ्याव्या लागतात. एका लोकप्रतिनिधीला व त्याच्या परिवाराला नागरी समस्या सोडविण्यासाठी इतका मनस्ताप पालिका प्रशासनामुळे झेलावा लागत असेल तर सर्वसामान्य करदात्या नवी मुंबईकरांची काय परिस्थिती होत असेल याचा आपण यातूनच बोध घ्यावा, असे गणेश भगत यांनी आयुक्त बांगर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
आजही प्रभागात ठिकठिकाणी डेब्रिजचे ढिगारे असून यामुळे प्रभागाला बकालपणा आला असून साथीच्या आजारांचा उद्रेक होण्याची भीती आहे. वारंवार सांगूनही डेब्रिज हटविले जात नाही. पावसाळीपूर्व कामांतर्गत केली जाणारी गटारे सफाईची तळापासून कामेही व्यवस्थित झाली नसून गटारामध्ये आजही कचरा दिसत आहे. डासांच्या उपद्रवामुळे नागरिकांना मलेरिया, डेंग्यूची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाच्या सुरूवातीला तसेच निसर्ग वादळातही प्रभागात मोठ्या प्रमाणावर वृक्षांची पडझड झाली, ठिसूळ फांद्या गाडीवर पडल्या. आम्ही भावंडांनि व कार्यकर्त्यांनी त्या फाद्या उचलून रस्ता मोकळा केला. तुम्ही स्वत: प्रभागात भेटीला आल्यावरच तुम्हाला समस्यांचे गांभीर्य व आमच्या म्हणण्यामागील कळकळ दिसून येईल. समस्या अजून खूप आहेत. आपण लवकरात लवकर या ठिकाणी स्वत: येवून पाहणी अभियान करा. आम्ही अधिक न बोललेले बरे. त्या अभियानात आपणासही सहभागी करून घेण्याची मागणी गणेश भगत यांनी केली आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago