Categories: Uncategorized

सारसोळे व नेरूळ सेक्टर सहामधील मार्गफलकांची दुरावस्था दूर करा : मनोज मेहेर

प्राजक्ता वाघमारे

नवी मुंबई : प्रभाग ८६ मधील सारसोळे व नेरूळ सेक्टर सहामधील मार्गफलकांची दुरावस्था दूर करून डागडूजी तसेच सुशोभीकरण करण्याची मागणी सारसोळे  गावचे ग्रामस्थ व  महापालिका ‘ब’ प्रभाग समितीचे माजी सदस्य  मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.महापालिका प्रभाग ८६ मध्ये सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहा परिसराचा समावेश होत आहे. या परिसरात आपण अंर्तगत भागातील रस्त्यावर तसेच चौकात फिरल्यास येथील मार्गफलकांची पूर्णपणे दुरावस्था झालेली असून त्या ठिकाणी बकालपणा आलेला आहे. मार्गफलकावरील माहिती असणाऱ्या पाट्या नाहीशा झाल्या असून केवळ  चौथरेच पहावयास मिळतात. अनेक ठिकाणचे चौथरेही तुटलेले आहेत. अन्य सेक्टर व गावांमध्ये नव्याने स्टील रॉड व फायबरमध्ये मार्गफलक बसविण्यात आले आहेत. मग प्रभाग ८६ मधील सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहा परिसरात अशा प्रकारे मार्गफलक का बसविण्यात आले नाहीत. अनेक वर्षापासून मार्गफलकांची दुरावस्था असतानाही पालिका प्रशासनाकडून डागडूजी तसेच सुशोभीकरण करण्यात आलेले नाही. यासंदर्भात विभाग कार्यालयात १३ ऑक्टोबर २०२० रोजी निवेदनही सादर केलेले आहे. तथापि प्रशासनाकडून या पत्राची दखल न घेण्यात आल्याने पुन्हा समस्येचे गांभीर्य निदर्शनास आणून देण्यासाठी हा पत्रव्यवहार करत असल्याचे मनोज मेहेर यांनी निवेदनात म्हटले आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago