Categories: Uncategorized

मूषक नियत्रंण कामगारांचे दोन महिन्याचे थकीत वेतन द्या : संदीप खांडगेपाटील

नवी मुंबई : नवी मुंबई पालिका प्रशासनात काम करणाऱ्या मूषक नियत्रंण कामगारांचे दोन महिन्याचे थकीत वेतन तातडीने देण्याची मागणी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे. याच संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाही लेखी निवेदन देताना वारंवार मुषक नियत्रंण कामगारांचे वेतन विलंबाने होत असल्याचे संदीप खांडगेपाटील यांनी राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे.

नवी मुंबई महापालिका प्रशासनात कंत्राटी पध्दतीने सुमारे ७५ मुषक नियत्रंण कामगार काम करत आहे. आज जानेवारी महिन्याची ५ तारीख संपली तरी या मूषक नियत्रंण कामगारांचे नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचे वेतन झालेले नाही. कोरोना काळात या कामगारांनी घरी न बसता मूषक नियत्रंणात ठेवण्याची व  दररोज कामावर येवून प्रशासनाला सहकार्य करण्याची कामगिरी केली आहे. एकतर मुषक नियत्रंण कामगारांचे  वेतनही तुटपुंजेच आहे. महागाईच्या काळात या कामगारांना वेतन विलंबाने देणे अडीच हजार कोटी रूपयांच्या ठेवी असणाऱ्या महापालिका प्रशासनाला भूषणावह बाब नाही. विशेष म्हणजे मूषक नियत्रंण कामगार काम करत असताना त्यांच्यासमवेत फोटो काढणारे राजकारणी त्यांच्या थकीत वेतनाबाबत कधीही पालिका प्रशासनाला जाब विचारत  नाही, ही शरमेची संतापजनक बाब आहे.  याप्रकरणी नवी मुंबई महानगरपालिकेतील संबंधितांना मूषक नियत्रंण कामगारांचे दोन महिन्याचे थकीत वेतन तातडीने देण्याचे निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे व राज्य सरकारकडे केली आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago