Categories: Uncategorized

सफाई कामगारांचे श्रेय राजकीय पक्षांनी घेवू नये : रवींद्र सावंत

नवी मुंबई : देशात तिसऱ्या क्रमाकांचा व राज्यात प्रथम क्रमाकांचा स्वच्छतेबाबतचा पुरस्कार नवी मुंबई शहराला प्राप्त झाला  आहे. सफाई कामगारांमुळे, अधिकाऱ्यांमुळे  तसेच नवी मुंबईकरांमुळे हा पुरस्कार मिळालेला आहे. सफाई कामगारांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न कोणत्याही राजकीय पक्षांनी व नेतेमंडळींनी लाटण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष व नवी मुंबई जिल्हा कॉंग्र्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी केले आहे.

केंद्र शासनाने स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियान अंतर्गत निकाल नुकताच जाहीर केला. यामध्ये चार श्रेणी मिळवत देशात तिसरा क्रमांक नवी मुंबई शहराला प्राप्त झाला आहे. मात्र यासाठी झटणारे कामगार आणि घनकचरा विभाग नवी मुंबई प्रशासन याचबरोबर स्थानिक जनतेच्या मेहनतीमुळे हा मानाचा तुरा खोवला आहे. तत्कालीन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान सफाई कामगारांनी यशस्वी केले आहे. मात्र नेहमीच्या सवयीने नवी मुंबई शहरातील काही राजकीय नेत्यांनी जणू आपल्यामुळेच हा मान मिळाला अशा अविर्भावात आयुक्तांची भेट घेऊन कामगारांचा झुठफुट सत्काराची नौटंकी केली. कामगारांना वेतन आयोग देण्यासाठी सत्तेत असताना स्थायी समितीच्या बैठकीत यासाठी संघर्ष करावा लागला. कामगार विरोधी धोरण राबवणाऱ्या नेत्यांनी फुकटचे फौजदार बनत आज माजी खासदार, माजी महापौर,अशा नेत्यांनी श्रेयबाजीसाठी केलेली धडपड लांच्छंनास्पद आहे. नवी मुंबई शहराला देशात मिळालेला तिसरा क्रमांक याचे श्रेय सर्वात आधी स्वच्छता दूत असणाऱ्या सफाई कामगार यानंतर शहरातील नागरिक आणि मनपा प्रशासन यांचे असून उगाच येवू घातलेल्या मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लुडबुड करणाऱ्या नेत्यांनी हे श्रेय घेऊ नये असे आवाहन रवींद्र सावंत यांनी केले आहे.

नवी मुंबई शहराला स्वच्छता सर्व्हेक्षणात देशात तिसऱ्या क्रमाकांचे व महाराष्ट्रात पहिल्या क्रमाकांचा  जो मान मिळाला  आहे, या यशाचे खरे श्रेय सर्वप्रथम नवी मुंबईकर जनतेला, महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना जात आहे. हे शहर स्वच्छ करण्यासाठी सर्वप्रथम नवी मुंबईकर नागरिक स्वंयस्फूर्तीने सहभागी झाले. त्यांनी आपल्या गृहनिर्माण सोसायट्या व सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवला. कचरा वाहक कामगारांनी तात्काळ कचरा डम्पिंग ग्राऊंडपर्यत नेला. सफाई कामगारांनी अंर्तगत व बाह्य परिसराची सफाई करत स्वच्छता निर्माण केली. अधिकारी वर्गाने स्वच्छतेबाबत जनजागृती करत कर्मचाऱ्यांकडून काम करवून घेतले. स्वच्छतेच्याबाबतीत नवी मुंबई शहराला  पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही या शहराला राज्य व केंद्र सरकारचे स्वच्छतेचे वेळोवेळी पुरस्कार मिळालेले आहेत. संत गाडगेबाबा नागरी  स्वच्छता अभियानात  राज्यात नवी मुंबई शहराला सलग दोन वर्षे प्र्रथम  क्रमाकांचे पारितोषिक मिळालेले आहे. त्यामुळे आजही स्वच्छतेच्या बाबतीत  मिळालेल्या या पुरस्काराचे श्रेय  या शहरातील नवी  मुंबईकरांना, पालिका कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांनाच आहे.  इतरांनी चमकेशगिरी  करताना फोटोसेशन अथवा बॅनरबाजी करून  ते श्रेय लाटण्याचा अथवा त्या माध्यमातून आपली प्रसिध्दीची हौस भागविण्याचा  प्रयत्न करू  नये असा उपहासात्मक टोला नवी  मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी लगावला आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago