Categories: Uncategorized

रमजान ईद साध्या पद्धतीने घरी थांबूनच साजरी करा: बाळासाहेब थोरात

मुंबई : इस्लाममध्ये पवित्र रमजान महिन्याला अनन्यसाधारण महत्व आणि स्थान आहे. परंतु यावर्षीचा रमजान कोरोना संकटाच्या सावटाखाली आल्यामुळे महिनाभर मुस्लीम बांधवांनी घरीच प्रार्थना करुन सरकारी नियमांचे पालनही केलेले आहे. आता रमजान ईदला सुद्धा घराबाहेर न पडता घरात थांबूनच ईद-उल-फित्र साजरी करावी आणि समाजापुढे एक आदर्श घालून द्यावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

थोरात पुढे म्हणाले की, देशावर कोरोनाचे आलेले संकट पाहता सर्व मुस्लीम बांधवांनी साध्या पद्धतीने रमजानचा महिना घराबाहेर न पडता, गर्दी न करता शासनाने वेळोवेळी घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करुन पार पाडला. रामनवमी,  हनुमानजयंती, गुढीपाडवा, महावीर जयंती,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीही सर्वांनी साध्या पद्धतीने व शांततेने साजरी केली, यंदाचा ईदउल-फित्र चा उत्सवही अशाच प्रकारे साजरा करावा. तसेच ईदच्या निमित्ताने सर्व जाती धर्मातील गोरगरीब, गरजू, कामगार यांना आवश्यक ती मदत करावी हीच ईदी ठरेल. लॉकडाऊनचे उल्लंघन करू नये, मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा न देता फोन, एसएमएस, व्हॉट्सएप सारख्या समाजमाध्यमाचा वापर करुन द्याव्यात, असे आवाहन करुन थोरात यांनी जनतेला रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago