Categories: Uncategorized

मध्यप्रदेश, झारखंडकडे रवाना होणाऱ्या ३५०० नागरिकांना महापालिकेमार्फत फुड पॅकेट्सचे वितरण

नवी मुंबई : कोव्हीड १९ च्या उपाययोजनांच्या अनुषंगाने जाहीर लॉकडाऊन काळात गरजू मजूर, कामगार, विस्थापित कामगार, बेघर नागरिक, काळजी घेण्यास कोणी नसलेल्या दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक अशा नवी मुंबईकर नागरिकांच्या दोन वेळच्या जेवणाची काळजी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात येत असून दररोज साधारणत: २४ हजारहून अधिक नागरिकांना १७ कम्युनिटी किचनच्या माध्यमातून जेवण वितरित करण्यात येत आहे. याकामी विविध स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती यांचेही मौलिक सहकार्य महानगरपालिकेस मिळत आहे.       अशाच प्रकारे काल रात्री नवी मुंबईतून मध्यप्रदेशातील रेवा तसेच झारखंडमधील हजारीबागकडे ट्रेनव्दारे रवाना होणाऱ्या ३५०० नागरिकांना भोजन व्यवस्था करून देणेबाबत ठाण्याचे तहसिलदार अधिक पाटील व मंडळ अधिकारी किरण भागवत यांचेमार्फत विनंती करण्यात आली होती. त्यास अनुसरून महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी तातडीने आदेश देत त्या ३५०० प्रवाशांना जेवणाची पॅकेट्स उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. त्या अनुषंगाने उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार आणि सहा. आयुक्त चंद्रकांत तायडे यांनी महानगरपालिकेच्या बेलापूर व नेरूळ येथील कम्युनिटी किचनव्दारे सहा. आयुक्त चंद्रकांत तांडेल व संजय तायडे यांच्या माध्यमातून हे फूड पॅकेट्स पनवेल रेल्वे स्टेशनवर तातडीने उपलब्ध करून दिले. बाहेरगांवी जाणाऱ्या प्रवाशांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून काळजी घेत उपलब्ध करून दिलेल्या या सेवेबद्दल समाधान व्यक्त केले.  

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago