Categories: Uncategorized

या चिमण्यांनो परत फिरा रे…. ग्रामीण भागातही चिमण्या होत आहेत दुर्मीळ

जागतिक चिमणी दिवस..(२०मार्च),  सध्याचे युग हे आधुनिक युग असल्याने प्रत्येजण धावपळीच्या मागे लागलेला आहे. अधिक पैसा कमविण्याच्या हवासापोटी आज निसर्गालाही विसरत चालेला आहे.त्यामुळे जंगलतोड ,वाढत्या प्रदुषणाचा फटका माणवाचे पशुपक्षांकडे होत असलेले दुर्लक्ष या साऱ्यामुळे त्याचा परिणाम निसर्गावर होवु लागला आहे.व आपल्या पाहण्यातल्या व घरामध्ये सकाळीच्या वेळेत चिवचिव करुन बागडणाऱ्या चिमकल्या चिमण्यांची संख्या अतिशय कमी झाल्याचे दिसण्यांत येत आहे.तर यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालेली असल्याने तपकिरी-चॉकलेटी रंगाच्या चिमण्या दिसणे काही काळानंतर कालबाहय होणाची चिंता पक्षिमित्रांनी व्यक्त केली आहे. विक्रमगड तालूक्यातील शहरासह आता ग्रामीण भागातही चिंमण्यासंख्या रोडवली आहे. सकाळीच अंथरुणांत असतांना व दिवसभर घरामध्ये चिवचिव करणाऱ्या तपकिरी-चॉकटेली रंगाच्या छोटयाच्या दिसायला आकर्षक असणाऱ्या चिमण्या सध्या दुर्मिळ झाल्या आहेत. याच चिमण्या पर्यावरणातील जीवजंतुचा नाश करुन वातावरणात स्वच्छ व निरोगी ठेवण्यात महत्वाची भुमिका बजावत असतात.

ग्रामीण भागात पूर्वी प्रतेक घराचा समोर चिमन्याचा खाद्य टाकण्या साठी सुप टांगलेले असायचे त्यामुळे घरा भोवती चिमण्याची वर्दल असायची जस जसा काल बदलत गेला तसा घराभोवती सुप टांगने बंद झाले. घराचा बाजूला खल असायचे त्यात पेंढा साठवलेला असायचा त्या पेंढा वरील दाणे खाण्यासाठी चिमण्याची गर्दी असायची ही खला पद्धत ग्रामीण भागातुन कमी झाल्याने त्यामुळेच गावात चिमण्या कमी झाल्या आहेत.

 पहाटेच्या वेळेस चिवचिवाट करुन उजेडाची जाणीव करुन देत वातावरण प्रसन्न ठेवणारा हा चिमुकला जिव आहे.वातारवणात चैतन्य आणत असतात,मात्र सध्या या जीवाचे अस्तित्वच सपुष्टात येत चाललेले आहे.  त्या दिसण्यास दुर्मिळ झाल्या आहेत.याबाबत पक्षमित्रांनी चिंताव्यक्त केली असुन भविष्यात चिमणी  हा पक्षी पुस्तकातच चित्ररुपाने पाहाण्याचे दुर्भाग्य येईल.अशी भितीही व्यक्त केली जात आहे. काही वर्षा पासुन चिमण्याची संख्या कमी होऊ लागली आहे. शहरा बरोबरच ग्रामीण भागात चिमणी संवर्धनासाठी सामाजिक संस्था आणि शासनाने पावले उचलायला हवी आहेत.

-अमोल सांबरे, मो. ९२७०२६६६९६

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago
magbo system