Categories: Uncategorized

कंत्राटी व ठोक मानधनावरील कामगारांची सेवा कायम करून त्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्याची मागणी

अॅड. महेश जाधव : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या कंत्राटी व ठोक मानधनावरील कामगारांची सेवा कायम करून त्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्याची मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष व नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे.

वाढत्या महागाईच्या काळात तारेवरची कसरत करणाऱ्या कामगारांच्या वेतनात झालेली वाढ ही खरोखरीच सुखावह बाब आहे. तथापि कायम कामगारांव्यतिरिक्त पालिका प्रशासनात कंत्राटी कामगार व ठोक मानधनावरील कामगार काम करत आहेत याकडे पालिका प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. नवी मुंबईत नेहमीच साथीचे आजार येतात. सध्या कोरोनाचा आजार देशात, राज्यात व इतरत्र फैलावत आहे. राज्य सरकारने शासकीय आस्थापनेत ५० टक्केचा फार्म्यूला लागू केला असताना तसेच खासगी आस्थापणांशी चर्चा करून तेथेही बंद करण्याबाबत विचारविनिमय केलेला आहे. कोरोना व्हायरस या आजारामुळे सर्व विभागांना सुट्टी जरी जाहीर केली असली तरी आरोग्य विभागाचे कर्मचारी आपला जीव मुठीत घालून आजही काम करत आहेत. सफाई कामगार, मूषक नियत्रंण विभाग कर्मचारी आजही आपले कामगार प्रामाणिकपणे काम करत आहेत. नवी मुंबई महापालिकेत करार पद्धतीने तसेच ठोक मानधनावर एएनएम काम करीत आहेत.  आस्थापनेवर काम करत असलेल्या एएनएमला सातवा वेतन आयोग लागू झाला असून ठोक मानधनावर काम करणाऱ्या एएनएम मात्र तुंटपुंज्या मानधनावर त्यांच्या आरोग्याला धोका असतानाही काम करत आहेत. काम करताना त्यांच्यामध्ये देखील उत्साह निर्मांण व्हावा यासाठी कंत्राटी व ठोक मानधनावर काम करणाऱ्या एएनएमला, शिपाई, लिपिक,अभियंता, तसेच सर्व वर्गातील उर्वरित सर्व कामगारांना पालिकेच्या सेवेत कायम करून घ्यावे तसेच त्यांना अन्य कायम कामगारांच्या धर्तीवर सातवा वेतन आयोग कंत्राटी व ठोक मानधनावरील कामगारांनाही लवकरात लवकर लागू करावा अशी मागणी रवींद्र सावंत यांनी केली आहे.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोळे यांच्या दालनात त्यांच्या उपस्थितीत काही दिवसापूर्वी बैठकही झाली होती. त्यांनी पालिका प्रशासनाला याबाबत निर्देशही दिले होते. कामगार हितासाठी आपणाकडून शक्य तितक्या लवकर कार्यवाही अपेक्षित असल्याचे रवींद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago