ठाणे : मुंबई पोलिसांपाठोपाठ ठाणे पोलिसांनीही छट पूजेला परवानगी नाकारली आहे. छट पूजेच्या दिवशी तलाव किंवा समुद्रकिनारी छट पूजा करु नका, गर्दी करु नका, तसेच छट पूजेनिमित्त कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम ठेवू नका, छट पूजा घरीच करा, असे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा आदेश काढण्यात आला आहे. अनलाॅक काळातही कलम १४४ नुसार जमावबंदी आदेश लागू असल्याने पोलिसांनी ही मनाई केली आहे.
छठ माता पूजा उत्सव समितीमार्फत दरवर्षी ठाण्यात मोठ्या प्रमाणात छठ पूजेचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या वर्षीही छठ पूजेनिमित्त विविध पूजा कार्यक्रमांचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करायचे आहे. यासाठी परवानगी द्यावी, असे पत्र छठ माता पूजा उत्सव समितीने ठाणे पोलिसांच्या कापूरबावडी पोलिसांना दिले होते. मात्र, पोलिसांनी या पत्राला उत्तर देत परवानगी नाकारली असल्याचे समितीला कळवले आहे.
ठाण्यात उपवन तलाव, मासुन्दा तलाव तसेच कोलशेत घाट येथे छट पूजेचे आयोजन होत असते. या ठिकाणी संगीत भजन कार्यक्रम केले जातात. मात्र, आता हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच कोणीही गर्दी करू नये, यासाठी याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर आयोजकांनीही नागरिकांना काळजी घ्यावी आणि यावर्षी घरातूनच सूर्य देवतेला वंदन करावे, असे आवाहन केले आहे.
संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज पनवेल :…
देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…
नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…
संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल : भाजपचे नगरसेवक तथा…
संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना महामारीच्या साथीने पुन्हा…