Categories: Uncategorized

बटरफ्लाय उद्यान बनविण्याची कॉंग्रेसची मागणी

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ४ मधील शांतीनिकेतन सोसायटीच्या बाजूला असलेल्या रिक्त भुखंडावर फुलपाखरू (बटर फ्लॉय) उद्यान बनविण्याची मागणी कॉंग्रेसच्या  नवी मुंबई जिल्हा सचिव  विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर आणि महापालिका नेरूळ विभाग अधिकारी दत्तात्रेय नांगरे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

नेरूळ  सेक्टर ४ मध्ये महापालिका विभाग कार्यालयापासून हाकेच्या अंतरावरच शांतीनिकेतन सोसायटीच्या बाजूलाच एक रिक्त भुखंड आहे. हा भुखंड अविकसित आहे. आपण आमच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देवून या  भुखंडावर स्वच्छता अभियान  राबवित भुखंडाची सफाई करून  दिली. तेथील बकालपणा हटविला याबाबत  सर्वप्रथम पालिका प्रशासनाचे  विद्या भांडेकर यांनी आभार मानले आहेत.

या भुखंडावर महापालिकेने  उद्यान फुलपाखरू (बटर  फ्लॉय )उद्यान विकसित करावे,  जेणेकरून परिसरातील बकालपणा संपुष्ठात येवून  त्या ठिकाणी सुशोभीकरण  होईल. कोणी  तेथे डेब्रिज व रॅबिटही टाकणार नाही. तसेच फुलपाखरू उद्यान  बनविल्यास ज्येष्ठ नागरिक, लहान  मुले, महिला  व  स्थानिक रहीवाशांनाही  त्याचा फायदा होईल. तरी आपण या अविकसित भुखंडाची  समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी व त्या भुखंडाचे पर्यायाने परिसराने सुशोभिकरण  करण्यासाठी महापालिका प्रशासनाने त्या ठिकाणी लवकरात लवकर फुलपाखरू उद्यान  विकसित करण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी केली आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago