Categories: Uncategorized

प्लास्टिक पिशव्या ठेवणारी दुकाने ‘सील’ करा : संदीप खांडगेपाटील

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेतील नेरूळ  पश्चिम  नोडमधील प्रभाग ८५ व  ८६  मध्ये प्लास्टिक पिशव्या आढळून येणाऱ्या दुकानांना आर्थिक दंड न लावता संबंधित दुकाने सील करण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.

नवी मुंबई शहरातील महापालिका प्रभाग ८५ व ८६ मधील सारसोळे गाव, कुकशेत गाव आणि नेरूळ सेक्टर सहामधील दुकानांमध्ये सर्रासपणे प्लास्टिक पिशव्या सामान घेवून जाण्यासाठी दुकानात येणाऱ्या ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. सरकारने प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणलेली असतानाही  किराणा मालाच्या तसेच अन्य दुकानांमध्ये खुलेआमपणे प्लास्टिकच्या पिशव्या उपलब्ध होत  आहेत.  अशा वेळी महापालिका प्रशासनाचे नेरूळ विभाग कार्यालयाची  भूमिका सर्वसामान्यांना  संशयास्पद वाटत आहे.  प्रभाग ८५ व  ८६ मधील  ज्या ज्या दुकानांमध्ये प्लास्टिक पिशव्या आढळून येतील ती दुकाने महापालिका प्रशासनाकडून सील करण्याची कारवाई करण्यात यावी. आर्थिक दंड कितपत लावला  जातो, याबाबतही संशय कायम असून प्रश्नचिन्ह आहे.  प्रभाग ८५ व ८६ मध्ये महापालिका प्रशासनाने सातत्याने प्लास्टिकविरोधी मोहीम राबवून हा परिसर प्लास्टिकमुक्त करण्यास नवी मुंबई महापालिका प्रशासनाला आदेश देवून सहकार्य करावे.  प्लास्टिक पिशव्या आढळून येणाऱ्या दुकानांना  सील लावल्यास कोणताही दुकानदार प्लास्टिक पिशव्या ठेवण्याचे धाडस दाखवणार नाही आणि परिसरही प्लास्टिक पिशव्यांतून  मुक्त होईल.  याप्रकरणी संबंधितांना प्लास्टिक पिशव्या आढळून येणाऱ्या दुकानांना सील करण्याचे आदेश नवी मुंबई महापालिका प्रशासनाला देवून प्रभाग ८५ व  ८६ प्लास्टिक पिशवी  मुक्त करण्याची मागणी पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago