Categories: Uncategorized

‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’ची दुरावस्था दूर करा : हरेश भोईर

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४

नवी मुंबई : पामबीच मार्गालगत असलेल्या ‘ज्वेल ऑफ नवी मुंबईची दुरावस्था तातडीने दूर करण्याची मागणी समाजसेवक हरेश भोईर यांनी लेखी निवेदनातून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.

नवी मुंबईचे सौदर्य वाढविणाऱ्या स्थळांमध्ये नेरूळ पामबीच मार्गालगत ‘ज्वेल ऑफ नवी मुंबईआहे.  या ठिकाणी सकाळी व सांयकाळी शेकडोच्या संख्येने आजूबाजूच्या परिसरातील महिला, पुरूष, मुले, ज्येष्ठ नागरिक फिरावयास येत असतात.  या ठिकाणी असणारे पथदिवे पूर्णपणे बंद आहेत. या ठिकाणी सांयकाळनंतर अंधार पडत असल्याने चोरी, वाटमारी, लुटमारी होण्याची भीती आहे. तसेच पायी फिरण्यासाठी येणाऱ्या महिला, तरूण मुलींवर रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा उचलत विनयभंग, अत्याचार होण्याचीही शक्यता  नाकारता  येत  नाही. या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने येथे कायदा व  सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण  होण्याची  भीती  आहे. समस्येचे गांभीर्य पाहता आपण संबंधितांना तातडीने नादुरूस्त पथदिवे दुरूस्त करण्याची व सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देण्याचे निर्देश द्यावे. उद्या कोणताही अनैतिक प्रकार घडल्यास, छेडछाड, विनयभंग, अत्याचाराची घटना  घडल्यास, वाटमारी, लुटमार झाल्यास या प्रकारास सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार राहील असा इशारा हरेश भोईर यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago