Categories: Uncategorized

प्रभाग ९६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट अभियान राबवा : गणेश भगत

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४

नवी मुंबई : प्रभाग ९६ मध्ये कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता येथे अॅण्टीजेन टेस्ट अभियान राबविण्याची मागणी समाजसेवक गणेश भगत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर व नेरूळ विभाग अधिकारी दत्तात्रय नांगरे यांच्याकडे केली आहे.

महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नेरूळ नोडमधील प्रभाग ९६ मध्ये नेरूळ सेक्टर १६, १६ए आणि सेक्टर १८ या परिसराचा समावेश होत आहे. या परिसरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा पालिका प्रशासनाला नव्याने सांगण्याची गरज नाही. परिसरातील रहीवाशांमध्ये अजूनही कोरोना आजाराबाबत भीती व गैरसमज कायम आहे. कोरोनाबाबत जनसामान्यांना प्रबोधन करण्यास व वस्तूस्थितीवर आधारित माहिती देण्यास पालिका प्रशासनाकडून पाहिजे त्या प्रमाणात प्रयत्न झालेले नाहीत, हेही यानिमित्ताने नमूद करावेसे वाटते. रहीवाशांना वारंवार माहिती देवूनही कोरोना टेस्ट करून घेण्यास रहीवाशी तयार होत नाहीत. कारण टेस्ट  केल्यावर अहवाल हा पॉझिटिव्हच येतो, असा जनसामान्यांचा समज झालेला आहे. याबाबत आम्ही घरटी  जावून आमच्या परिने लोकांची सेवा आणि प्रबोधन करत आहोत.  पालिका प्रशासनाच्या वतीने  प्रभागात अॅण्टीजेन टेस्ट अभियान राबविल्यास आम्ही तुम्हाला सहकार्य करू. घराघरात जावून टेस्ट करून  घेण्यासाठी रहीवाशांना प्रवृत्त करू. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पालिका प्रशासनाला आमच्या प्रभागात जे जे उपक्रम राबवयाचे असतील त्यासाठी आम्ही सहकार्य करू. कोरोनाचा उद्रेक कमी होवून आता अस्तित्व कोठेतरी संपले पाहिजे. पालिका प्रशासनाने प्रभाग ९६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट अभियान लवकरात लवकर सुरू करावे,अशी मागणी समाजसेवक गणेश भगत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago