Categories: Uncategorized

कोरोनाविरोधात लढतेय नवी मुंबई

जगाच्या कानाकोपऱ्यात सध्या कोरोना महामारीचाच विषय चर्चिला जात होते. चीनमधून आलेल्या या आजाराने होत्याचे नव्हते करून टाकले आहे. दीड वर्षापौर् कोणी ‘एका आजारामुळे सर्व जगाचे अर्थकारण थांबून अब्जावधी लोक देशोधडीला लागतील’ असे भाकीत जरी वर्तविले असते तरी त्याची गणना कोणीही मुर्खातच केली असती. परंतु आता या कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेकांनी कोरोनाच्या तव्यावर आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्नही केला. सत्ताधारी-विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपही झाले. धन्वतंरीच्या पुजाऱ्यांनी आपले यामध्ये कोरोना रूग्णांना अव्वाच्या सव्वा बील लावत आपले उखळही पांढरे करून घेण्याचा प्रयत्नही केला. डॉक्टर, परिचारिका, पोलिस, अन्य आरोग्य कर्मचारी हे खऱ्या अर्थाने कोरोना योध्दा ठरले. या कोरोना योध्द्यांच्या जोडीला नागरी सुविधा पुरविणारे आणि नागरी समस्या सोडविणारे  त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांतील कर्मचारीदेखील आरोग्य योध्दाच मानले पाहिजे. कोरोना काळातही या सर्वानी आपली सेवा प्रामाणिकपणे बजावली. हेच चित्र नवी मुंबईतही थोड्या फार फरकाने पहावयास मिळाले. पण राज्यातील नव्हे तर देशातील अन्य भागांच्या तुलनेत नवी मुंबईकरांचे वेगळेपण पहावयास मिळाले. कोरोना काळात घरात न बसता येथील राजकीय व सामाजिक घटक रस्त्यावर उतरले. मदतीचा ओघ सुरू केला. जंतुनाशक फवारणी, गोळ्यांचे वितरण, अन्नदान, मॉस्क, सॅनिटायझर इतकेच नाहीतर गरजूंना धान्याचे वितरण करण्यासाठी या सर्वच घटकांनी पुढाकार घेतला. कोरोनाचा मुक्काम वाढत गेला म्हणून नवी मुंबईचे राजकारणी व समाजकारणी घरात बसले नाही तर त्यांनी रस्त्यावर उतरून पुढाकार घेतला, हे चित्र आजही दिघा ते बेलापुरदरम्यान विखुरलेल्या नवी मुंबईत आजही पहावयास मिळाले. कोरोना त्यांचा प्रभाव वाढवत असतानाही रस्त्यावर उतरून स्वत:चा जीव धोक्यात घालून गरजूंची मदत करणाऱ्या नवी मुंबईकरांच्या उत्साहाला कोरोना मात्र पराभूत करू शकला नाही. नवी मुंबईकरांनी कोरोनाच्या विरेधात सुरू केलेल्या जनसेवेला नकळत का होईना सॅल्युट करण्याकरिता हात उंचावला गेलाच पाहिजे.

सुरूवातीच्या काळात मार्चच्या मध्यावर लॉकडाऊन सुरू झाल्यावर कोरोनाचा फारसा प्रभाव नवी मुंबईत नव्हता. नवी मुंबई महापालिका प्रशासनाने व खासगी रूग्णालयांनी मात्र कोरोनाविरोधात लढण्यासाठी जय्यत तयारी व सुविधा उपलब्ध करून ठेवली होती. नवी मुंबई हे एकमेव असे शहर आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी लोक येतात, या शहराला यामुळेच नवी मुंबई नव्हे तर मिनी मुंबई या नावाने संबोधले जात आहे. राज्याच्या नव्हे तर देशाच्या कानकोपऱ्यातून भाज्या व फळे, किराणा माल, धान्य या ठिकाणी या ठिकाणी येत असते. कोरोना काळातही एपीएमसी मार्केट व मार्केट आवारातील पाचही बाजारपेठांचे व्यवहार सुरूच होते. भाजपाच्या दोन्ही स्थानिक आमदारांनी मागणी करूनही राज्य सरकारने बाजारपेठ बंद होवू दिली नाही. लोकांची गैरसोय होवू नये यासाठी बाजारपेठा सुरूच राहणार असल्याचे स्पष्टीकरण राज्य सरकारकडून देण्यात आले. याच मार्केटमध्ये नंतर कोरोनाचा उद्रेक झाला. प्रशासनाने तो उद्रेक संपुष्ठात आला. कोरोनाची झळ व्यापारी व अन्य घटकांनाही बसली. काहींना आपल्या घरातील सदस्य गमवावे लागले.

लॉकडाऊन सुरू होताच सर्वसामान्यांना घरी बसण्याची वेळ आली. काहींवर बेरोजगारीची, काहींवर अंशकालीन बेरोजगारीची वेळ आली. लॉकडाऊन मध्यावरच जाहिर करण्यात आल्याने पगारही लोकांचे संपले होते. घरात धान्य नाही, खिशात पैसा नाही अशी नवी मुंबईतील नोकरदार वर्गाची अवस्था होती. घरातील माणसांची ही अवस्था, तर रस्त्यावरील भिक्षेकऱ्यांची , नाका कामगारांची, दररोज काम करून पोट भरणाऱ्यांची काय अवस्था असेल याची कल्पनाही न केलेली बरी. अशा वेळी नवी मुंबईतील समाजसेवेची आवड असणारे राजकारणी तसेच राजकारणाशी देणेघेणे नसणारे समाजसेवक रस्त्यावर उतरले. अनेकांनी आपल्या खिशातून अन्नदानास सुरूवात केली. रेल्वे स्टेशन, उड्डाणपुल, झोपडपट्टी, चाळी आदी ठिकाणी अन्नदानाचे काम सुरू झाले. कोणी उपाशी राहणार नाही याची काळजी घेण्यात आली. कोरोनामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका लांबणीवर पडल्याची बाब नवी मुंबईकरांच्या पथ्यावरच पडली. राजकारणातील प्रस्थापित तसेच निवडणूक लढवू पाहणारे व नगरसेवक होवू पाहणारे महत्वाकांक्षी इच्छूक घटक कोरोना काळात प्रभागातील जनतेच्या मदतीसाठी धावून आले. यामुळे रहीवाशांना फारसा त्रास झाला नाही. रहीवाशांना घराघरात धान्य मिळाले. गृहनिर्माण सोसायट्यांमधील पदाधिकाऱ्यांकडे जावून मदतीबाबत राजकीय घटक विचारणा करू लागले. गरजू लोकांची यादी स्वत:हून मागू लागले. प्रस्थापित व इच्छूकांमध्ये चढाओढ निर्माण झाल्याने नवी मुंबईकरांना कोरोना काळाचा फारसा त्रास झाला नाही. केवळ स्थानिक त्या त्या भागातील राजकारणीच नाही तर नवी मुंबईतील आमदार गणेश नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, शिवसेनेचे विजय नाहटा, नामदेव भगत, विजय चौगुले, कॉंग्रेसचे रमाकांत भगत, रवींद्र सावंत, अनिल कौशिक, संतोष शेट्टी, राष्ट्रवादीचे अशोक गावडे, भाजपाचे अनेक रथी-महारथींनी मदतकार्यात स्वत:ला वाहून घेतले. नवी मुंबईतील १११ प्रभागात वरीष्ठ पातळीवर मातब्बर नेतृत्वांनी टेम्पो भरभरून धान्य पाठविले. घरात बसून राहीलेल्या नवी मुंबईकरांना त्या त्या प्रभागातील राजकीय घटकांनी आर्सेनिक गोळ्या, मास्क, सॅनिटायझर व अन्य कशाचीही कमतरता पडू दिली नाही. कोरोनाशी नवी मुंबई झुंजली, लढली, उत्साह आजही कायम आहे, मदतीचा ओघ आजही सुरूच आहे.  हाताची पाचही बोटे सारखी नसतात. कोरोना काळात काही रूग्णालयांनी रूग्णांची लुटमार करण्याचा प्रयत्न मनसेचे ब्रम्हास्त्र गजानन काळे रूग्नांच्या मदतीला धावून आले.  अडवणूक करू पाहणाऱ्या रूग्णालयांना धडा शिकविताना स्वत: रूग्नालयात जावून रूग्णांना बाहेर घेवून आले. रूग्नालयांना मनसे स्टाईलचा प्रत्यय दिला.

कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून येताच त्याला रूग्नालयात प्रवेश मिळवून देणे, ऑक्सिजन उपलब्ध करून देणे, व्हेन्टिंलेटर मिळवून देण्यासाठी धावपळ करणे आदी कामे सर्वपक्षीय राजकारणी आजही उत्साहाने व हिरीरीने करत आहेत. पालिका प्रशासनाकडून कोरोनाविरोधात लढाई लढताना खासगी रूग्नालयांच्या तोडीस तोड सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोरोना रूग्णांना घरापासून कोव्हिड सेंटरपर्यत विनामूल्य बससुविधा, कोरोनामुक्त झाल्यावर पुन्हा कोव्हिड सेंटर ते घरापर्यत विनामूल्य सुविधा पालिका प्रशासनाने दिली. कोविड सेंटरमधील सुविधाही सर्वोत्तम होती. पंखे, वातानुकुलित यंत्रणा, वेळेवर नाष्टा, जेवण, गरम पाणी व अन्य उपचार यामध्ये कोठेही दिरंगाई आढळून आलेली नाही. एकीकडे कोरोना रूग्नांवर उपचार सुरू असताना दुसरीकडे राजकीय व सामाजिक घटकांनी कोरोना रूग्णांच्या निवासी भागात तातडीने जंतुनाशक फवारणीचा सपाटा लावत जनतेला दिलासा दिला. कोरोना मुक्त होवून येणाऱ्या रहीवाशांचे त्या त्या भागात जंगी स्वागत करण्यात आले. पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे यासह त्या त्या पक्षाचे मातब्बर नेत्यांनी, मंत्र्यांनी नवी मुंबईत सतत भेटी देवून नवी मुंबईकरांना सावरण्याचे काम करताना आपल्या समर्थकांना प्रोत्साहीत करण्याचे काम केले. आगरीकोळी भवन, वारकरी भवन, सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी हॉस्पिटल या ठिकाणच्या सुविधा खासगी रूग्णालये असणाऱ्या अपोलो, रिलायन्स व अन्य रूग्णालयांच्या तोडीस तोड होती. कोरोना रूग्णांची आता आकडेवारी कमी होवू लागली असून नवी मुंबई आता पूर्वपदावर येवू लागली आहे. कालपरवापर्यत घरात बसलेला नवी मुंबईकर आता पोटापाण्यासाठी रस्त्यावर उतरून उपजिविकेसाठी हातपाय मारू लागला आहे. दुकाने उघडू लागली आहेत. रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. नवी मुंबईकरांनी कोरोनाला हरविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, परंतु कोरोना मात्र नवी मुंबईकरांच्या उत्साहापुढे पराभूत झाला. यावेळी मतभेद विसरून नवी मुंबईकर एकत्रपणे कोरोनाविरोधात लढल्याचे सर्वानीच जवळून पाहिले.

:- संदीप खांडगेपाटील, साभार, दै. नवराष्ट्र, संपर्क : ८३६९९२४६४

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago