Categories: Uncategorized

प्रभाग ७६ मधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागात धुरीकरण करा : पांडूरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा, प्रभाग ७६ मधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागात धुरीकरण करण्याची मागणी स्थानिक भाजप नेते पांडूरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

सध्या पावसाळा पूर्णपणे संपला आहे. परतीच्या पावसाचाही कारभार आता पूर्णपणे आटोपला आहे. प्रभाग ७६ मध्ये सानपाडा सेक्टर २,३, ४, ८ या परिसराचा समावेश होत  आहे. या प्रभागात अधिकांशपणे सिडको गृहनिर्माण सोसायट्यांचा व काही प्रमाणात खासगी सोसायट्यांचा समावेश होत आहे. येथील सदनिकाधारक अल्प तसेच मध्य उत्पन्न गटातील रहीवाशांचे निवासी वास्तव्य आहे. सध्या सानपाडा नोडमध्ये डासांचा उद्रेक वाढीस लागला आहे. पावसाळ्यात महापालिका धुरीकरण करत नसल्याने आता साथीच्या आजाराचा उद्रेक टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात धुरीकरण मोहीम राबविणे आवश्यक आहे. प्रभाग ७६ मधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात धुरीकरण करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी पांडूरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago