Categories: Uncategorized

प्रभाग ४२ मध्ये सोसायटी अंतर्गत भागात धुरीकरण करून द्या : सुनिता हांडेपाटील

नवी मुंबई : महापालिका प्रभाग ४२ मधील गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात धुरीकरण करून देण्याची मागणी समाजसेविका व भाजपा कार्यकर्त्या सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.

महापालिका प्रभाग ४२ मध्ये कोपरखैराणे सेक्टर २२,२३, १६,१७ या परिसराचा समावेश होत आहे. प्रभाग ४२च्या मागील बाजूस खाडी असल्याने येथील रहीवाशांना बाराही महिने डासांचा व साथीच्या आजाराचा सामना करावा लागत आहे. सध्या पावसाळा पूर्णपणे संपला असून परतीचा पाऊसही येवून गेला आहे. पावसाळ्यात पालिका प्रशासन धुरीकरण करत नाही. आता पावसाळा नसल्याने प्रभाग ४२ मधील कोपरखैराणे सेक्टर २२,२३, १६,१७ या ठिकाणच्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या आतील भाग, रो-हाऊसच्या सोसायट्या व एलआयजीच्या धर्तीवरील बैठे कंपाऊड यातील आतील भागात लवकरात लवकर परंतु नियमितपणे धुरीकरण करण्याचे  संबंधितांना निर्देश द्यावेत, जेणेकरून डासांचा त्रास व साथीचे आजार आटोक्यात येण्यास मदत होईल. प्रभागालगतच असलेला खाडीकिनारा यामुळे डासांच्या उद्रेकाचे गांभीर्य आपल्या निदर्शनास येईल. त्यामुळे आपण संबंधितांना तसे निर्देश द्यावेत अशी मागणी सुनिता देविदास  हांडेपाटील यांनी केली आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago