Categories: Uncategorized

आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नाने अखेर नेरुळमध्ये साकारणार सायन्स सेंटर

आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नाने अखेर नेरुळमध्ये साकारणार सायन्स सेंटर

श्रीकांत पिंगळे  : ९८२००९६५७३ :Navimumbailive.com

नवी मुंबई : बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नाने अखेर नेरूळ से-१९ येथील वंडर्स पार्क क्षेत्रात सायन्स सेंटर उभारण्यात येणार आहे. सद्यस्थितीत त्याकरिता ७० कोटी रूपये कोटी मंजूर करण्यात आले असून लवकरच सदर सायन्स सेंटर उभारण्याचे काम सुरु होणार असल्याचे नवी मुंबई महापालिका प्रशासनाने सूचित केले आहे. सायन्स सेंटर उभारल्याने नवी मुंबईच्या विकासात भर पडणार असून नवी मुंबईतील नागरिकांना त्याचा आनंद लुटता येणार आहे. आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या दूरदृष्टीतून नवी मुंबईत प्रामुख्याने बेलापूर मतदारसंघात सायन्स सेंटर  साकारण्यात यावे, अशी मागणी तत्कालीन महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांजकडे २०१५ साली करण्यात आली होती. तसेच आयुक्त, तत्कालीन शहर अभियंता व संबंधित अधिकाऱ्यांसह सायन्स सेंटर  उभारण्यात येणाऱ्या ठिकाणी दौराही केला होता. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही सदर विषयाच्या अनुषंगाने भेट घेतली होती. आपल्या विशेष प्रयत्नाने बेलापूर विधानसभा क्षेत्रात सायन्स सेंटरची उभारणी होणार असल्याने प्रयत्नांचे सार्थक झाल्याचे मत आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी व्यक्त केले.

          नेरूळ से-१९ येथील वंडर्स पार्क मधील क्षेत्रात सुमारे ३५ हजार चौ.मी. जागेत सदरचे सायन्स सेंटर उभारण्यात येणार असून सायन्स सेंटरचा पहिला टप्पा २० हजार चौ.मी. वर विकसित केला जाणार आहे. त्याकरिता ७० कोटी रूपये मंजूर करण्यात आले असून नवी मुंबईचे विद्यार्थी आणि रहिवासीच नव्हे तर राज्य व देशातील पर्यटकांचेही हे मुख्य आकर्षण ठरणार असल्याचेही आमदार सौ.मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago