संदीप खांडगेपाटील : ८८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ – Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने १६ फेब्रुवारी २०१९ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील इयत्ता पाचवीचे ३२ तसेच इयत्ता आठवीचे १० असे एकूण ४२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण व्हिजनचा झेंडा उज्ज्वल यश संपादन करीत या विद्यार्थ्यांनी डौलाने फडकवला असून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी या गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छतेसह इतर अनेक क्षेत्रांमधील उल्लेखनीय कामगिरीमुळे नेहमीच नावलौकीकपात्र ठरलेली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे विविध उपक्रमांतून लक्ष दिले जात आहे. याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच स्पर्धा परीक्षांचा सराव व्हावा याकरिता महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आवर्जून प्रविष्ट केले जाते. याची फलश्रुती म्हणून इयत्ता ५ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ३२ व इयत्ता ८ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत १० असे ४२ विद्यार्थी सन २०२० च्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये झळकले आहेत.
यामध्ये, इयत्ता पाचवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत राजू चंद्रा या राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय शाळा क्र. ५५, कातकरीपाडा, आंबेडकर नगर, राबाडे शाळेतील विद्यार्थ्याने २१४ गुण (७४.८० %) संपादन करून इयत्ता पाचवीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत महानगरपालिका शाळांतील शिष्यवृतीधारक ३२ विद्यार्थ्यांमधून सर्वाधिक गुण संपादन करून सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.
त्याचप्रमाणे इयत्ता आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळा क्र. ४२, घणसोली येथील रितेश बिरूदेव वाघमोडे या विद्यार्थ्याने २१४ गुण ( ७२.७० %) मिळवून नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील इयत्ता आठवीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीधारक १० विद्यार्थ्यांमधून सर्वप्रथम क्रमांक संपादन केलेला आहे.
इयत्ता पाचवीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृ्ती परीक्षेत नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. ५५, कातकरीपाडा येथील राजू चंद्रा ( ७४.८० %), प्रसन्ना कांबळे व श्रुती बिराजदार (६७ %), आयुष बनसोडे व गणेश येरे आणि रोहित जपानकर ( ६३ %), स्नेहल साळुंखे (६२ %), स्वाती मुद्देवाड (६१.५ %), अश्वेता कांबळे (६१ %), हे ९ विद्यार्थी तसेच नमुंमपा शाळा क्र. ४२ घणसोली मधील विवेक पवार ( ७२.२० %), विजय खेडकर ( ७२ %), प्रिती कदम (६७ %), प्रथमेश कांबळे व अक्षरा साळुंखे ( ६५ %), मनिषा राठोड (६२ %), संघर्ष खरात व वैभवी पानमाड (६१.५० %), सिध्देश विभाटे (६० %) हे ९ विद्यार्थी त्याचप्रमाणे नमुंमपा शाळा क्र. ३३ पावणे मधील साहिल जाधव (६९.९० %), भक्ती काशद व आदित्य पाटील (६४.३० %), वैष्णवी पाखरे (६२.९० %) हे ४ विद्यार्थी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृतीच्या गुणवत्ता यादीत झळकले.
त्यांच्याप्रमाणेच नमुंमपा शाळा क्र. ३१ कोपरखैरणे मधील आदित्य भाबड (७२.९० %), आकांक्षा ढोके (६३.१० %) आणि नमुंमपा शाळा क्र. १५ शिरवणे येथील भूमी टोले (७३.६० %), आसमा अन्सारी (७०.८० %) तसेच शाळा क्र. ७६, घणसोली मधील आदर्श मौर्या (६२.२० %), प्रेमचंद मौर्या (६० %) या ३ शाळांतील प्रत्येकी २ विद्यार्थ्यांनीही पाचवीची शिष्यवृत्ती प्राप्त केली.
याशिवाय नमुंमपा शाळा क्र. ९१, दिवा येथील अस्तुती झा (६८.३०%), नमुंमपा शाळा क्र. २७ वाशीगाव येथील फातिमा मुल्ला (६१.५० %), नमुंमपा शाळा क्र. २९ जुहूगांव येथील धनश्री शिर्के (६२.७० %), नमुंमपा शाळा क्र. ७४ कोपरखैरणे मधील फुटी महोंतो या विद्यार्थ्यांनीही इयत्ता ५ वीची शिष्यवृत्ती पटकाविली.
इयत्ता आठवीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत नमुंमपा शाळा क्र. ४२ घणसोली मधील रितेश वाघमोडे (७२.७०%), केदार भोसले (६३.९०%), शुभांगी सावले (६२.५०%), प्रणिकेत कांबळे व वैष्णवी हजारे (६१.९०%) या ५ विद्यार्थ्यांनी तसेच नमुंमपा शाळा क्र. ३१ कोपरखैरणे येथील सानिका गुंडाकर (७१.४०%), अनुप देसाई (६८%), स्नेहा कोमाने (६१.६०%) या ३ विद्यार्थ्यांनी त्याचप्रमाणे नमुंमपा शाळा क्र. २ तुर्भे स्टोअर येथील तेजस गायके (६८ %) व नमुंमपा शाळा क्र. ५५, कातकरीपाडा रबाळे मधील येशुदास गवालवाड (६१.२०%) या विद्यार्थ्यांनी इयत्ता आठवीची स्कॉलरशीप संपादन करून नवी मुंबई महानगरपालिका शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख उंचावला आहे.
महानगरपालिका शाळांतील शिष्यवृत्तीधारक ४२ गुणवंत यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अभिनंदन केले असून या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेने स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी करून घेतलेली विद्यार्थ्यांची तयारी आणि शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या शैक्षणिक सुविधा व शिक्षकांचे नियमित मार्गदर्शन याबाबत पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज पनवेल :…
देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…
नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…
संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल : भाजपचे नगरसेवक तथा…
संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना महामारीच्या साथीने पुन्हा…