Categories: Uncategorized

आ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नाने उभारण्यात आलेल्या दिवाळे पगवाले जेट्टीचे लोकार्पण

नवी मुंबई : ‘बेलापूर’च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नाने तसेच त्यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या दिवाळे गावातील पगवाले जेट्टीचे उद्घाटन आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या उपस्थितीत ‘भाजपा’चे गनवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री विजय घाटे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, महामंत्री जगन्नाथ केोळी, समाजसेविका सौ. दिप्ती केोळी, अध्यक्ष अनंता बोस, ज्ञानेश्वर केोळी, कैलास केोळी, किशोर नाईक तसेच अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, सदर जेट्टीच्या कामास 65 लाख रुपये इतका खर्च झाला असून पुढील रेलिंगच्या कामासही साडे सात लाख रक्कमेची तरतूद आमदार निधीतून करण्यात आली आहे. दिवाळे गावातील स्थानिक मच्छीमार बांधवांना त्यांच्या होड्या लावण्याकरिता, त्यांना मासेमारीला जाण्याकरिता सोयी उपलब्ध व्हाव्यात याकरिता त्यांनी जेट्टी निर्माण करावी अशी मागणी केली होती. त्यानंतर माझ्या आमदार निधीतून तसेच मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून सदर जेट्टीचे वाम पूर्ण केलेे. जेट्टीच्या बाजुतील रेलिंगच्या कामासही लवकरच सुरुवात होणार असून त्याकरिता माझ्या आमदार निधीतून तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दिली.
दिवाळे गावात दिवाळी सणाला खूप महत्व देण्यात येत असून यावेळी गावातील ग्रामस्थांचे बैरी देव तीन दिवसांकरिता गावातील मंदिरात स्थानापन्न झालेले असतात. गावातील बैरी देव यांचे वाजत गाजत आगमन व्हावे याकरिता सदर जेट्टीचे लोकार्पण 11 नोव्हेंबर रोजी करण्यात आले. दिवाळे गावातील जेट्टीकरिता 10 केोटी रुपये मंजूर वरण्यात आले आहेत.
परंतु, वाही परवानग्यांअभावी कामांना सुरुवात वरण्यात आली नसल्याचे आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. गावातील मच्छी मार्केटच्या कामासाठीही पर्यावरण विभागाच्या परवानगीची आवश्‍यकता असून सदरची बाब कोर्टात प्रलंबित आहे. सदरबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यास सुसज्ज सर्व सुविधायुक्त असे मच्छी मार्केट उदयास येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, दिवाळे गांव नवी मुंबईतील पहिले स्मार्ट गाव बनेल असा माझा विश्वास असून त्यावरिता प्रत्येक ग्रामस्थाने, गावातील लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केले आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago