Categories: Uncategorized

नेरूळ पश्चिमेला सर्वत्र मनोज मेहेरच्याच उमेदवारीचीच चर्चा

महेश जाधव : Navimumbaillive.com@gmail.com: 9820096573

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या सहाव्या सार्वत्रिक निवडणूकीचा बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता असून १५ ते २० मार्चदरम्यान निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. त्यानंतर एक महिन्याच्या कालावधीत निवडणूका, मतदान व मतमोजणीही संपन्न होईल. प्रस्थापितांसह इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केल्याचे नवी मुंबईतील नोडनोडमध्ये पहावयास मिळत आहे. नेरूळ पश्चिमला आठ प्रभाग मोडत असून या आठही प्रभागात इच्छूक व प्रस्थापितांमध्ये सर्वच बाबतीत सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहा या ओबीसी राखीव झालेल्या प्रभागातून मनोज मेहेरच्या समर्थकांकडून घरटी, परिचितांशी सुसंवाद, गाठीभेटी, ग्रामस्थांची कामे, कॉलनीतील शाळाप्रवेश यासह सोशल मिडियावर जोरदार आक्रमक मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे. नेरूळ पश्चिमेला मनोज मेहेर हे आपल्या कामातून परिचित व्यक्तिमत्व असल्याने गेली १५ वर्षे सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहासाठी राबणाऱ्या मनोज मेहेरच्या परिश्रमाला न्याय हा मिळालाच पाहिजे ही भाषा आता नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांकडून व खुद्द सारसोळे गावच्या ग्रामस्थांकडून बोलली जावू लागली आहे.

महापालिका प्रभाग ८६ हा प्रभाग पुर्नरचनेत ओबीसी आरक्षित जाहिर होताच मनोज मेहेर हा निवडणूकीला उभा राहणार नाही तर तोच आता आपला नगरसेवक असणार असा विश्वास काही तासातच सारसोळेच्या ग्रामस्थांकडून आणि नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांकडून व्यक्त केला जावू लागला आहे. गेली १५ वर्षे सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहाच्या विकासासाठी पोलीस आयुक्तालय, पोलीस स्टेशन, सिडको, महापालिका मुख्यालय, मंत्रालय, पालिका विभाग अधिकारी कार्यालयात सतत मनोज मेहेरनडे हेलपाटे मारले आहेत. नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावच्या विकासासाठी तत्कालीन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबारात सर्वाधिक हेलपाटे मारणारा मनोज मेहेर हा एकमेव नवी मुंबईकर होता. २००५ ते २०१० या कालावधीत तर महापालिका, सिडको, जनता दरबार, मंत्रालयात तब्बल ७ हजाराहून अधिक तक्रारपत्रे मनोज मेहेरने सादर केली होती. तत्कालीन खासदार डॉ. संजीव नाईक यांनी तर खुद्द गणेश नाईकांच्या वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात भरलेल्या जनता दरबारात सर्वसामान्याबाबत करत असलेल्या परिश्रमाबाबत व पाठपुराव्याविषयी शाबासकीची थाप मनोज मेहेरच्या पाठीवर दिली होती. त्यावेळी व्यासपिठावर जनता दरबारात लोकनेते गणेश नाईकांसोबत बसणारे  अशोक गावडे, शशिकांत बिराजदार, सुधाकर सोनवणे यांच्यासह अनेकांनी लोकनेते गणेश नाईकांना मनोज मेहेरच्या पाठपुराव्याची कल्पनाही उघडपणे दिली होती.

सारसोळे गावातील अनेकजण राजकारणात असतील, परंतु पालिका, मंत्रालय, सिडको, पोलीस आयुक्तालय, वनविभाग दरबारी सारसोळेच्या समस्यांसाठी झटणारा मनोज मेहेर हा एकमेव चेहरा असल्याने मनोज मेहेर तेथे जाताच सारसोळेकर आले म्हणून आजही मनोज मेहेरचा उल्लेख होत आहे. आरक्षण जाहिर होताच अनेक इच्छूकांनी मोर्चेबांधणीस प्रारंभ केला, त्यावेळी मनोज मेहेर मात्र सलग दोन दिवस पामबीच जवळील नाल्यात उभा राहून जेटीवरील तुटलेल्या पाण्याच्या नळाची दुरूस्ती करवून घेत होता. ही बाब सारसोळेच्या ग्रामस्थांनी, पामबीच मार्गावरून जाणाऱ्या राजकारण्यांनी, पत्रकारांनी, तसेच एका प्रसिध्द वृत्तवाहिनीच्या संपादकांनीही जवळून पाहिली होती.

शिवडी-न्हावाशेवा पुलामुळे नवी मुंबईतील मासेमारीवर व मासेमारी करणाऱ्या आगरी-कोळी समाजाच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण होणार आहे.  यामुळे बाधित होणाऱ्या मच्छिमारांना सरकारकडून नुकसानभरपाई मिळावी म्हणून बेलापुरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी आमदारकीच्या नात्यातून मंत्रालयदरबारी पाठपुरावा केला तर सारसोळेकर ग्रामस्थ या नात्याने सारसोळेच्या मच्छिमारांना न्याय मिळावा म्हणून मनोज मेहेरने मुख्यमंत्री व पालकमंत्री कार्यालयात निवेदनाचा रतीब पाडला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयातील एका पत्रकारच्या माध्यमातून व सहाव्या मजल्यावरील प्रशासकीय अधिकारी बागुलसाहेबांच्या माध्यमातून भेट घेवून सारसोळेच्या समस्या त्यांच्यासमोर कथन करत नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्याचीही मागणी केली होती. मात्र या भेटीबाबत गोपनीयता बाळगत मनोज मेहेरने कोणत्याही प्रकारची स्टंटबाजी अथवा फोटोसेशन केले नाही. सारसोळेच्या ग्रामस्थांना नुकसान भरपाई  मिळेल त्याचदिवशी आपले परिश्रम सार्थकी लागतील अशी भावना मनोज मेहेर यांनी व्यक्त केली.

बेलापुरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबईतील मच्छिमार समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारकडे नुकसान भरपाईचा तगादा लावला. या पाठपुराव्याला यश मिळाले. लवकरच नवी मुंबईतील मच्छीमारांना नुकसान भरपाईचा पहिला टप्पा मिळणार आहे, त्यात सारसोळे गावातील शंभराहून अधिक मच्छिमारांना नुकसान भरपाईचा पहिला टप्पा मिळणार आहे. उर्वरित मच्छीमारांना टप्याटप्याने न्याय मिळणार असून शेवटच्या मच्छिमाराला नुकसान भरपाई भेटत नाही तोपर्यत आपण स्वस्थ बसणार नसल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी जाहीरही केले आहे. चारच दिवसापूर्वी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी मनोज मेहेरच्या माध्यमातूनस सारसोळेच्या शाळेत सारसोळेच्या ग्रामस्थांची भेट घेत  नुकसानभरपाईची पार्श्वभूमी सांगितली. या कार्यक्रमातही आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी मनोजच्या कार्याचा व गावच्या विकासासाठी करत असलेल्या परिश्रमाविषयी बोलताना स्तुतीसुमने उधळताना कोठेही हात आखडता घेतला नाही.

सध्या दिघा ते बेलापुर प्रस्थापितांची आपली गढी टिकविण्यासाठी तर महत्वाकांक्षी इच्छुकांनी नगरसेवकाची लढाई जिंकण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. नेरूळ पश्चिमच्या आठही प्रभागातील राजकारण्यांमध्ये तसेच रहीवाशांमध्ये सध्या मनोज मेहेरच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू आहे.  नेरूळ पश्चिमेला मनोज मेहेर परिचित व्यक्तिमत्व  आहे. सर्वाशीच संबंध चांगले आहे. काम करणारा, पाठपुरावा करणारा, सर्वसाठी धावपळ करणारा अशी मनोज मेहेरची नेरूळ पश्चिमेला प्रतिमा आहे.पत्रकारांशीही आपुलकीची व घरोब्याचे संबंध असल्याचे प्रसिध्दीमाध्यमांनीही गेल्या दीड दशकात मनोज मेहेरचे परिश्रम जवळून पाहिले आहेत. त्यामुळे मनोज हो रे आता तु नगरसेवक अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांकडून व्यक्त होवू लागले आहे. नेरूळ सेक्टर सहामधील मनोज मेहेरचा मित्र परिवार व रहीवाशीच आता अळीमिळीच्या थाटात प्रचाराचा पहिला टप्पा पार पाडू लागले आहेत. साडे बारा टक्केमधील रहीवाशांशी असलेला व्यक्तिगत जनसंपर्क व केलेली कामे, घरटी परिचय मनोज मेहेरला आताच्या निवडणूकीत साडे बारा टक्केच्या इमारतीमध्ये उपयुक्त ठरणार आहे. सारसोळे गावातील ग्रामस्थही आता मनोज मेहेर उभा राहणार व सर्वाधिक मतदान घेणार अशी भाषा उघडपणे बोलू लागले आहे. मनोज मेहेरच्या मित्रमंडळींनीही सोशल मिडीयावर मनोज मेहेरचा प्रचार करण्यास सुरूवात केली असून लवकरच प्रचाराचा धुराळा चहूबाजूंनी उडणार असल्याचे चित्र आताच प्रभाग ८६ मध्ये दिसू लागले आहे. मनोज मेहेरच्या माध्यमातून ५ वर्षानंतर पुन्हा एकदा सारसोळेच्या ग्रामस्थांना आणि नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांना स्थानिक नगरसेवक पहावयास मिळणार आहे. बेलापुरच्या भाजप आमदार सौ. मंदाताई म्हात्रे या मनोज मेहेरला त्याच्या कार्यानिशी जवळून ओळखत आहेत. लोकनेते गणेश नाईक, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक हेदेखील मनोज मेहेरच्या परिश्रमाला जाणून आहेत. नवी मुंबईचे विकासपर्व असणारे संदीप नाईक हे तर मनोज मेहेर तर माझा भाऊ असल्याचे संबोधतात. महाआघाडीच्या व भाजपच्या संभाव्य राजकीय अटीतटीच्या लढतीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग ८६ मधून मनोज मेहेर हा हक्काचा नगरसेवक म्हणून ओळखला जावू लागला आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago