Categories: Uncategorized

निवडणूकीची कॉंग्रेसकडूनही जोरदार तयारी सुरू : ना. विजय वड्डेटिवार

शहर लुटणाऱ्यांना नवी मुंबईकर जनता धडा शकविणार

नवी मुंबई  : नवी मुंबई महानगरपालिकेवर सत्ता गाजवणाऱ्यांनी आजवर या शहरालाच लुटण्याचा एककलमी कार्यक्रम राबविला आहे. लोकसेवेच्या नावाखाली या शहराला लुटण्याचे काम करणाऱ्यांना नवी मुंबईकर जनता धडा नक्कीच शिकवेल. पालिका निवडणूकीनंतर नवी मुंबईत नक्कीच परिवर्तन होणार. कॉंग्रेस पक्षाकडूनही महापालिका निवडणूकीची जोरदार तयारी सुरू झाली असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री तसेच चंदपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांनी केले.

नेरूळ सेक्टर दोन येथे नवी मुंबई कॉंग्रेस नेरूळ ब्लॉक निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे माजी विधानसभा विरोधी पक्षनेते व मंत्री विजय वड्डेटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यालयाच्या माध्यमातून कॉंग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी लोकांच्या समस्या सोडवतील, वरिष्ठ नेतेमंडळी कार्यकर्त्याशी सतत समन्वयाची भूमिका ठेवतील. तक्रारी घेवून येणाऱ्या लोकांना न्याय मिळण्यासाठी येथील कॉंग्रेसकडून प्रयत्न झालेच पाहिजेत. कॉंग्रेसकडूनही महापालिका निवडणूकीची जोरदार तयारी सुरू असून कॉंग्रेस पक्ष निवडणूक तयारीत सर्वात पुढे असल्याचे आजच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटनावरून दिसून येत आहे.

आजच्या कार्यक्रमास मिळालेला प्रतिसाद पाहिल्यावर कॉंग्रेस पक्षावर अजूनही जनतेचे प्रेम असल्याचे स्पष्ट होत असून माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला कॉंग्रेस पक्षाने दिलेले ताकद व स्थानिकांचे प्रेम यातून दिसून आल्याचे सामगत नवी मुंबई इंटक अध्यक्ष रवींद्र सावंत आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, नवी मुंबई इंटकच्या माध्यमातून कामगारांच्या समस्या सोडवित असताना विधी मंडळातही नवी मुंबईतील कामगारांच्या समस्या सातत्याने मांडत असतो. कॉंग्रेसने महापालिका निवडणूकीसाठी रणशींग फुंकले. नेरूळमधील छोट्याशा भागात प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी कॉंग्रेसचे मातब्बर नेते व कॅबिनेट मंत्री आले, यातूनच ही निवडणूक गंभीरपणे घेतल्याचे दिसून येत आहे. गेली अनेक वर्षे लोकांची सेवा करतोय, जनतेनेही भरभरून प्रेम केले आहे. पालिका निवडणूकीनंतर कॉंग्रेसचाच महापौर असणार, नेतेमंडळी सर्वसामान्य कॉंग्रेस कार्यकर्त्याच्या मागे ठामपणे उभी आहेत. कॉग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने उभा रहतोय, कार्यकर्ता दिवसरात्र झटतोय, यामुळे महापालिकेत यापुढे कॉंग्रेसचाच महापौर दिसणार असा विश्वास नवी मुंबई इंटक अध्यक्ष व नेरूळ तालुका ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्षा रवींद्र सावंत यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

यावेळी कॉंग्रेसचे नवी मुंबई निरीक्षक माजी आमदार मोहन जोशी, कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणिस संतोष शेट्टी, नवी मुंबई कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, माजी उपमहापौर अविनाश लाड, कॉंग्रेसच्या प्रवक्त्या लीना निमये यांनीही यावेळी समयोचित भाषण करताना महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना प्रोत्साहित करण्याचे काम केले.

यावेळी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष व नेरूळ तालुका ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांचाही वाढदिवस सर्वसामान्य जनतेकडून व कॉंग्रेस पक्षाकडून उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास कॉंग्रेसचे नवी मुंबई सचिव विजय कुरकुटे, प्रल्हाद गायकवाड, नवनाथ चव्हाण,. तुकाराम कदम, नगरसेविका मीरा पाटील, नवी मुंबई कॉंग्रेस अल्पसंख्यांकचे अध्यक्ष अनवर हवलदार, सेवादल अध्यक्ष राजगोपाल, विद्या भांडेकर, सुशांत लंबे, मयुर शिवथरे, कुमार यादव, विवेक उत्तेकर, महेश भोईटे, संतोष पाटील उपस्थित होते.

आजच्या कार्यक्रमास मिळालेला प्रतिसाद पाहिल्यावर कॉंग्रेस पक्षावर अजूनही जनतेचे प्रेम असल्याचे स्पष्ट होत असून माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला कॉंग्रेस पक्षाने दिलेले ताकद व स्थानिकांचे प्रेम यातून दिसून आल्याचे सामगत नवी मुंबई इंटक अध्यक्ष रवींद्र सावंत आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, नवी मुंबई इंटकच्या माध्यमातून कामगारांच्या समस्या सोडवित असताना विधी मंडळातही नवी मुंबईतील कामगारांच्या समस्या सातत्याने मांडत असतो. कॉंग्रेसने महापालिका निवडणूकीसाठी रणशींग फुंकले. नेरूळमधील छोट्याशा भागात प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी कॉंग्रेसचे मातब्बर नेते व कॅबिनेट मंत्री आले, यातूनच ही निवडणूक गंभीरपणे घेतल्याचे दिसून येत आहे. गेली अनेक वर्षे लोकांची सेवा करतोय, जनतेनेही भरभरून प्रेम केले आहे. पालिका निवडणूकीनंतर कॉंग्रेसचाच महापौर असणार, नेतेमंडळी सर्वसामान्य कॉंग्रेस कार्यकर्त्याच्या मागे ठामपणे उभी आहेत. कॉग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने उभा रहतोय, कार्यकर्ता दिवसरात्र झटतोय, यामुळे महापालिकेत यापुढे कॉंग्रेसचाच महापौर दिसणार असा विश्वास नवी मुंबई इंटक अध्यक्ष व नेरूळ तालुका ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्षा रवींद्र सावंत यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago