Categories: Uncategorized

देयकाचा भरणा करण्यासाठी गुगल पे, फोन पे, पेटियम आदि माध्यमाचा वापर करू द्या

पर्यावरणप्रेमी रवींद्र भगतांची पालिका आयुक्त अभिजित बांगरांकडे मागणी

नवी मुंबई : मालमत्ता कर व पाणीदेयकाचा भरणा करण्यासाठी महापालिका प्रशासनाने गुगल पे, फोन पे, पेटियम आदि सुविधांचा  वापर करण्याची परवानगी देण्याची मागणी पर्यावरणप्रेमी रवींद्र भगत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.

सध्या कोरोनाचा काळ आहे. लोक सरकारी सुचनांची व घालून दिलेल्या मार्गदर्शक नियमावलीची अंमलबजावणी करताना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडत नाही. बॅकामध्येही जाण्याचे टाळून अन्य मार्गाने घरबसल्याच  इंटरनेटच्या माध्यमातून बॅकींग व्यवहार करत आहेत. सध्या महापालिका प्रशासनाने पाणीपट्टी व मालमत्ता कर रहीवाशांना पाठविण्यास सुरूवात केली आहे. महापालिका प्र्रशासनाने नवी मुंबईकरांना पाणीपट्टी व मालमत्ता कर भरण्यासाठी फोन पे, गुगल पे, पेटियम  आदी साधनांचा वापर करण्यास परवानगी देणे आवश्यक आहे. ज्यायोगे पाणीदेयक व मालमत्ता कर देयक भरण्यासाठी लोकांना महापालिका विभाग अधिकारी कार्यालयात जाण्याची वेळ येणार नाही. महाराष्ट्रातील अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांनी  महापालिकेत देयके भरण्यासाठी फोन पे, गुगल पे, पेटियम  आदींचा वापर करण्याची सुविधा दिलेली आहे. त्या धर्तीवर नवी  मुंबईकरांना देयके भरण्यासाठी अशी सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी  लवकरात लवकर निर्णय घेवून संबंधितांना निर्देश देण्याची मागणी रवींद्र भगत यांनी केली आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago