Categories: Uncategorized

ज्ञानेश्वर शेलार सांस्कृतिक केंद्रात मालमत्ता कर व पाणी देयक भरणा पुन्हा सुरू करा

शिवसेना विभागप्रमुख रतन मांडवेंची महापालिका आयुक्तांकडे मागणी

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ८ मधील कै. ज्ञानेश्वर शेलार सांस्कृतिक केंद्रात मालमत्ता कर व पाणी देयक भरणा केंद्र पुन्हा सुरू करण्याची मागणी शिवसेनेचे नेरूळ पश्चिमचे विभागप्रमुख रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून महापालिका प्रभाग ८७ मधील नेरूळ  सेक्टर ८ परिसरातील कै. ज्ञानेश्वर शेलार सांस्कृतिक केंद्रात महापालिका प्रशासनाकडून मालमत्ता कर व पाणी देयक भरणा स्विकारला जात होता.  स्थानिक रहीवाशांसह सभोवतालच्या परिसरातील रहीवाशांची यामुळे गैरसोय टाळली जात असे. लॉकडाऊननंतर या सांस्कृतिक केंद्रात मालमत्ता कर व पाणी देयक भरणा पालिका प्रशासनाकडून बंद करण्यात आले आहे. त्यामुळे रहीवाशांकडून पुन्हा गैरसोय वाढीस लागली आहे. स्थानिक जनतेला व सभोवतालच्या परिसरातील जनतेला पाणी देयक व मालमत्ता कर भरण्यासाठी महापालिका विभाग अधिकारी कार्यालयात जावे लागते. आता कोरोना पर्व कमी व्हायला लागले आहे. सर्वत्र  नियम  शिथील व्हायला लागले आहे. स्थानिक जनतेची भरणा करण्यासाठी होत  असलेली गैरसोय टाळण्यासाठी समस्येचे गांभीर्य पाहता  लवकरात लवकर नेरूळ सेक्टर ८ मधील कै. ज्ञानेश्वर शेलार सांस्कृतिक केंद्रात मालमत्ता कर व पाणी देयक भरणा पुन्हा सुरू करण्याची मागणी शिवसेना विभागप्रमुख रतन मांडवे यांनी केली आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago