Categories: Uncategorized

ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेसाठी रवींद्र सावंत यांनी घातली शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरेंना साद

नवी मुंबई : ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेसाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. या  प्रस्तावास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे नवी मुंबई शिवसेनेनेही पाठपुरावा करून संबंधित कामगारांच्या कायम सेवेसाठी सहकार्य करावे यासाठी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी रविवारी (दि. ८ ऑक्टोबर) शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांची भेट घेवून साद घातली आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांची वाशीतील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात रवींद्र सावंत यांनी महापालिकेतील ठोक मानधनावरील कामगारांसमवेत भेट घेवून त्यांना याप्रकरणी सहकार्य करण्याची गळ घातली. नवी मुंबई इंटकच्या वतीने ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेसाठी सहकार्य करण्याबाबत साकडे घातले. कामगारांनीही या बैठकीत आपली कैफीयत शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांच्यासमोर सादर केली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी कामगार नेते रवींद्र सावंत व कामगारांचीही नगरविकास मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घडवून आणण्याचे व  ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची सेवा कायम करण्यासाठी शिवसेना इंटकच्या प्रयत्नाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago