Categories: Uncategorized

ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेच्या प्रस्तावामध्ये शिक्षकांचा व अन्य कर्मचाऱ्यांचाही समावेश करा : रवींद्र सावंत

नवी मुंबई : राज्य सरकारकडे प्रशासनाने पाठविलेल्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेच्या प्रस्तावामध्ये शिक्षकांचा व अन्य कर्मचाऱ्यांचाही समावेश करण्याची मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

महापालिका प्र्रशासनाकडून नुकताच राज्य सरकारकडे ठोक मानधनावर पालिका प्र्रशासनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा कायम व्हावी यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्या प्र्रस्तावामध्ये पालिका प्र्रशासनात ठोक मानधनावर काम करणाऱ्या शिक्षकांचा समावेश करण्यात आलेला नाही तसेच उल्लेखही करण्यात आलेला नाही.  पालिका प्र्रशासनात ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या प्र्रस्तावामध्ये ठोक मानधनावरील शिक्षकांचाही समावेश करून सुधारीत प्र्रस्ताव पाठविण्यात यावा. पालिका  प्र्रशासनात ठोक मानधनावर काम करणाऱ्या अन्य कर्मचारी व अधिकाऱ्यांची सेवा कायम  होत असताना ठोक मानधनावर काम करणाऱ्या शिक्षकांना त्यापासून वंचित ठेवणे योग्य नसून ही बाब संबंधित शिक्षकांवर अन्याय करणारी आहे. पालिका प्रशासनाने ठोक मानधनावर काम करणाऱ्या शिक्षकांचाही विचार करताना शिक्षकांचा त्या प्रस्तावामध्ये समावेश करून सुधारीत प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवावा अथवा पाठविण्यात आलेल्या प्र्रस्तावाला जोडून हा  शिक्षकांच्या कायम सेवेचा पुरवणी प्रस्ताव सादर करावा, तसेच अन्य कोणत्या आस्थापनेत ठोक मानधनावर काम करत असतानाही नजरचुकीने प्रस्तावात त्यांचा उल्लेख राहून गेला असल्यास नवीन सुधारीत अथवा पुरवणी प्रस्तावात त्यांचाही समावेश करण्यात यावा अशी मागणी कामगार नेते रवींद्र सावंत यांनी केली आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago