Categories: Uncategorized

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटी बसेसची सुविधा सुरू करण्याची मागणी

सुवर्णा खांडगेपाटील

शिवसेना विभागप्रमुख रतन मांडवे यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंकडे मागणी

नवी मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एसटी बसेसची सुविधा सुरू करण्याची मागणी नेरूळमधील शिवसेना विभागप्रमुख व माजी नगरसेवक रतन मांडवे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

गणेशोत्सव ऑगस्ट महिन्यात येत आहे. शहरातील रहीवाशी ग्रामीण भागात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने जात असतात. गणेशोत्सवासाठी कोकणवासियांना सरकार एसटीची सुविधा उपलब्ध करून देत आहे. ही खरोखरीच चांगली बाब आहे. तथापि कोकणच्याच धर्तीवर उर्वरित महाराष्ट्रातही गणेशोत्सवाकरिता गावी जाण्याकरिता एसटी बसेसची सुविधा किमान ऑगस्ट महिन्यात उपलब्ध करून द्यावी. खासगी वाहनांचे भाडे आता सर्वसामान्यांना परवडणारे नाही. त्यामुळे आपण महाराष्ट्रात गणेशोत्सवाकरिता जाण्याकरिता अन्य भागातही लवकरात लवकर एसटी बसची सुविधा देण्यासाठी  संबंधितांना निर्देश द्यावेत, यातून ग्रामीण  भागात गणेशोत्सव साजरा करण्याकरिता शहरवासियांना जाणे शक्य होईल आणि दुसरे म्हणजे एसटी उपक्रमाला निधीही प्राप्त होईल. आपण लवकरात लवकर याबाबत संबंधितांना निर्देश  देवून  महाराष्ट्रातील जनतेला दिलासा  द्यावा, असे रतन मांडवे यांनी निवेदनात म्हटले आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago