Categories: Uncategorized

अन्यथा हॉस्पिटलला कॉंग्रेस टाळे ठोकणार : रवींद्र सावंत

अक्षय काळेNavimumbailive.com@gmail.com

०००००००००००००००००००००००००

हॉस्पिटल नवी मुंबईत  चालवण्यात येत आहे. या रूग्णालयास कोव्हिड रूग्णालय म्हणून मान्यता नाही. तथापि या रूग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येत आहे. रूग्णांची या  ठिकाणी लूट करण्यात येत आहे. या ठिकाणी रूग्णालय चालू करण्यास महापालिका प्रशासनाने कशी  परवानगी दिली, याचीही यानिमित्ताने चौकशी  होणे आवश्यक आहे. हॉस्पिटलवर कारवाई पालिकेने न केल्यास  त्या रूग्णालयाला  जावून  आपण टाळे ठोकणार असल्याचा इशारा  नवी  मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी दिला आहे.

०००००००००००००००००००००००

नवी मुंबई : महानगरपालिकेने परवानगी दिलेल्या रुग्णालयांमध्येच कोरोना झालेल्या रुग्णांवर उपचार करता येतात, परंतु परवानगी नसलेल्या काही रुग्णालयांमध्येही उपचार केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा रुग्णालयांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी याविषयी आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला आहे. नवी मुंबईमध्ये कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे तीन स्तरीय रचना तयार करण्यात आली आहे. डेडिकेटेड कोविड रुग्णालय, कोविड हेल्थ सेंटर व कोविड केअर सेंटर तयार करण्यात आली आहेत. मनपा रुग्णालयांसह काही खासगी रुग्णालयांनाही कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे, परंतु सद्य:स्थितीमध्ये घणसोली, कोपरखैरणे व वाशी परिसरातील काही रुग्णालयांमध्ये परवानगी नसतानाही तेथे कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. रुग्णांकडून उपचारासाठी लाखो रुपये बिल आकारले जात आहे.

परवानगी नसताना उपचार करण्यात येणाऱ्या रुग्णालयांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी. सदर ठिकाणी उपचार करताना काही चुका झाल्या व रुग्णांचा मृत्यू झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. आयुक्तांनी लवकर या तक्रारीची दखल घेतली नाही, तर आंदोलन करण्याचा इशाराही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

  • संचारबंदी लागू करण्याची कॉंग्रेसची  मागणी

नवी मुंबईमध्ये अनलॉक सुरू झाल्यापासून नियमांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणात होत आहे. मास्कचा वापर केला जात नाही. सोशल डिस्टन्सिंग नियमांचे उल्लंघन केले जात आहे. यामुळे शहरात संचारबंदी लागू करण्यात यावी, अशी मागणीही रवींद्र सावंत यांनी केली आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago