Categories: Uncategorized

सारसोळेच्या खाडीत बामणदेवाचा भंडारा उत्साहात

नवी मुंबई : नवसाला पावणारा व भाविकांच्या हाकेला धावून जाणारा अशी नवी मुंबई, ठाणे-रायगड  पट्टीत ख्याती असलेल्या बामणदेवाचा भंडारा सारसोळेच्या खाडीत उत्साहाने पार पडला. विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजक असलेल्या सारसोळेच्या ग्रामस्थांकडून बामणदेवाचा भंडारा रद्द केलेला असतानाही दिवसभरात असंख्य भाविकांनी बामणदेवाचे दर्शन घेतले.

महाशिवरात्रीच्या दिवशी दरवर्षी बामणदेवाचा भंडारा भाविकांच्या उत्स्फूर्त गर्दीत साजरा होत असतो. यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर भंडारा सारसोळे ग्रामस्थांकडून रद्द करण्यात आला होता. कोरोना पाहता भंडारा रद्द करण्यात आल्याचे फलकही पामबीच मार्गावर सारसोळे ग्रामस्थांकडून लावण्यातही आले होते. तरी दरवर्षीप्रमाणे सकाळपासून रात्री उशिरापर्यत बामणदेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची वर्दळ सुरूच होती. नवी मुंबईतील सामाजिक, धार्मिक, सहकार, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी दर्शनासाठी  मोठ्या संख्येने बामणदेव  मंदिराजवळ हजेरी लावली होती.

सिडकोचे माजी संचालक व शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक नामदेव भगत, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, स्थायी समितीचे माजी सभापती संपत शेवाळे, महापालिकेतील माजी नगरसेवक सुरज पाटील, शिवसेना विभागप्रमुख व माजी नगरसेवक रतन मांडवे, माजी नगरसेविका सुजाता पाटील, जयश्री ठाकूर, मिरा पाटील, सुनिता मांडवे, समाजसेवक गणेश भगत, भाजयुमोच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. सुहासिनी नायडू, नवी मुंबई कॉंग्रेसचे जिल्हा सचिव गुरू म्हात्रे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुका अध्यक्ष महादेव पवार, कॉंग्रेसचे नेरूळ तालुका सचिव दिनेश गवळी, नेरूळ गावचे जयवंत पाटील, शिवसेना उपविभागप्रमुख प्रल्हाद पाटील, संकेत सरफरे, भाजपचे वॉर्ड अध्यक्ष विलास चव्हाण, समाजसेवक रवी भगत, अशोक गांडाळ, सागर मोहिते उपस्थित होते.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago