Categories: Uncategorized

कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी राज्य सरकारला कर्ज काढावे लागणार?

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com : ९८२००९६५७३

मुंबई : करोना विषाणूची साथ आणि त्यानंतर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका राज्य सरकारच्या तिजोरीला बसला आहे. त्यामुळे एप्रिल ते जून या तीन महिन्यांचे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सरकारला १५ ते २० हजार कोटींचे कर्ज काढावे लागण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

राज्य सरकारवरील कर्जाचा भार आधीच वाढता आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे गेल्या काही दिवसांपासून सर्व उद्योग, व्यवसाय व आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. वस्तू व सेवा कर (GST), मुद्रांक शुल्क (Stamp Duty), अबकारी कर (Excise) व परिवहन करांच्या माध्यमातून मिळणारा महसूल पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळं राज्याला जवळपास ४० हजार कोटींचा महसुली तोटा झाला आहे.

मागील वर्षीच्या मार्च महिन्यात राज्याच्या तिजोरीत ४२ हजार कोटींचा महसूल जमा झाला होता. यंदाच्या मार्चमध्ये त्यात तब्बल ६० टक्क्यांची घट झाली आहे. यंदाच्या मार्च महिन्यात सरकारला करांपोटी केवळ १७ हजार कोटी मिळाले आहेत. त्याचप्रमाणे, एप्रिल २०१९ मध्ये राज्याचे महसुली उत्पन्न २१ हजार कोटी होते. यंदाच्या एप्रिलमध्ये म्हणजेच, चालू महिन्यात आतापर्यंत फक्त ४ ते ५ हजार कोटी मिळाले आहेत. ही घट तब्बल ७६ टक्के आहे.

केंद्राकडून येणारा परताना मागील वर्षीपासून कमी होत असून यंदा त्यात आणखी घट झाली आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर २०१९ च्या जीएसटी परताव्यापोटी राज्याला फक्त १८०० कोटी मिळाले आहेत. आणखी ५ हजार कोटी येणे आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

राज्यावर सध्या ५.२ लाख कोटी इतके कर्ज आहे. कर्जाच्या व्याजापोटी महिन्याला ३ हजार कोटी द्यावे लागतात. सध्याचा लॉकडाऊन उठला तरी अर्थव्यवस्थेचे गाडे रुळावर येण्यासाठी अनेक महिने लागणार आहेत. त्यामुळे राज्याचे महसूल उत्पन्न जेमतेमच राहणार आहे. पुढील ऑक्टोबरपर्यंत राज्य सरकारचे महसुली उत्पन्न नेहमीच्या तुलनेत अवघे ५० टक्क्यांनी कमी असेल, असा सरकारी अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago