Categories: Uncategorized

२६ मार्चला अंतिम मतदार यादी होणार प्रकाशित

स्वयंम न्युज ब्युरो : ९८२००९६५७३ : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२० मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

            नवी मुंबई :      मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्याकडील २४ फेब्रुवारी २०२० रोजीच्या पत्रान्वये नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२० मतदार यादीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे.  त्यानुसार दि. ३१ जानेवारी हा मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक असून प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी ९ मार्च २०२० रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ९ मार्च ते १६ मार्च हा कालावधी जाहीर करण्यात आला असून या हरकती व सूचना विहित नमुन्यात नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय निवडणूक विभाग आणि संबंधित विभाग कार्यालय याठिकाणी दाखल करता येतील. प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी महानगरपालिका मुख्यालय आणि संबंधित प्रभागाच्या विभाग कार्यालयातील सूचना फलकावर तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे.

     २३ मार्च रोजी प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. तसेच २४ मार्च  रोजी मतदान केंद्रांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे. अंतिम प्रभाग निहाय व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करून २६ मार्च  रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहेत.

      नवी मुंबई महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना व नकाशे नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर नागरिकांच्या माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.  तरी जाहीर करण्यात आलेल्या मतदार यादी कार्यक्रमाची नोंद संबंधितांनी घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago