Categories: Uncategorized

हिवताप विभागात तांत्रिक पर्यवेक्षक पद निर्माण करून संबंधित कामगारांना मस्टरवर घ्या : रवींद्र सावंत

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ /  ९८२००९६५७३ /Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : हिवताप विभागात डासअळीनाशक फवारणी व रासायनिक धुरीकरण व रासायनिक धुरीकरण निविदा / कार्यादेशमध्ये तांत्रिक पर्यवेक्षक पद निर्माण करून संबंधित कामगारांना मस्टर (हजेरी पत्रक) वर घेण्याची मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

महापालिका प्रशासनामध्ये गेल्या अनेक वर्षापासून तांत्रिक पर्यवेक्षक म्हणून आरोग्य विभागातील नागरी आरोग्य केंद्रात हिवताप विभागामध्ये ठेकेदाराच्या माध्यमातून कार्यरत आहेत. या कामगारांकडून हिवताप विभागामध्ये डास अळीनाशक फवारणी व रासायनिक धुरीकरण पर्यवेक्षणाचे काम प्रभावीपणे केले जात आहे . हिवताप विभागाचे काम तांत्रिक काम असल्यामुळे तेथे तांत्रिक पर्यवेक्षक असणे बंधनकारक आहे. परंतु या सर्व तांत्रिक पर्यवेक्षकांची नेमणूक ठेकेदारामार्फत केलेली (तात्पुरत्या स्वरूपात) आहे. तांत्रिक पर्यवेक्षक हे पद पूर्वी कामगारांसमवेत मस्टर (हजेरीपत्रक) वर सन २००२ पर्यत होते. त्याबाबत मस्टरचे छायाकिंत प्रत या निवेदनासोबत रवींद्र सावंत यांनी जोडली आहे.

तांत्रिक पर्यवेक्षकांना पूर्वीप्रमाणे मस्टरवर घेण्याकरीता नवीन निविदा / कार्यादेशात तशी तरतूद करण्यात यावी की जेणेकरून या कामगारांना अनेक वर्षापासून काम करत असल्याबाबत न्याय मिळेल. या कामगारांना वेतन तुटपुंजे असून महागाईच्या काळात त्यांना आज घर चालविणे अवघड आहे. या कामगारांना समान कामाला  समान  न्याय यानुसार वेतन देण्याची कार्यवाही सर्वप्रथम  होणे आवश्यक असल्याचे रवींद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.

हिवताप विभागाच्या नवीन येणाऱ्या निविदा / कार्यादेशामध्ये तांत्रिक पर्यवेक्षक पद हे ठेकेदारांमार्फत न करता डासअळीनाशक फवारणी व रासायनिक धुरीकरण  कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे पालिकेच्या मस्टरवर घेवून या पर्यवेक्षकांना न्याय द्यावा अशी  मागणी कामगार नेते रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago