Categories: Uncategorized

स्थानिक परवानाधारक फेरीविक्रेत्यांना प्रथम संधी द्या अन्यथा बाहेरच्या फेरीवाल्यांना हाताला धरून बाहेर काढणार : गणेश भगत

संदीपखांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२०००९६५७३
Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com 

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर १८ ए मधील मोकळ्या भुखंडावर फेरीविक्रेत्यांना बसविताना स्थानिक परवानाधारक फेरीविक्रेत्यांना प्रथम संधी देण्याची मागणी जनसेवक गणेश भगत यांनी लेखी निवेदनातून ५ जानेवारी रोजी महापालिका नेरूळ विभाग अधिकारी दत्तात्रेय नांगरे यांच्याकडे केली आहे. स्थानिक परवानाधारक फेरीविक्रेत्यांना प्रथम संधी द्या अन्यथा बाहेरच्या फेरीवाल्यांना हाताला धरून बाहेर काढणार असल्याचा इशारा गणेश भगत यांनी महापालिका प्रशासनाला  दिला आहे.

नेरूळ सेक्टर १८ ए येथे महापालिकेचा मोकळा भुखंड मार्केट आहे. या मोकळ्या भुखंडावर परिसरातील फेरीविक्रेत्यांना व्यवसायासाठी बसविण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून सुरू झालेली आहे. या प्रक्रियेत फेरीविक्रेत्यांना व्यवसायासाठी बसविताना सर्वप्रथम प्रभागातील सेक्टर १६, १६ए, १८, १८ ए, २० आणि २४ मधील परवानाधारक फेरीविक्रेत्यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. स्थानिक भागातील परवानाधारक फेरीवाल्यांना या ठिकाणी व्यवसायासाठी  सर्वप्रथम  संधी मिळणे आवश्यक आहे, तो त्यांचा हक्कच आहे. स्थानिकांना डावलून अन्य भागातील परवानाधारक  फेरीविक्रेत्यांना त्या ठिकाणी संधी मिळाल्यास तो प्रकार खपवून घेतला जाणार नाही. प्रभागातील परवानाधारक फेरीविक्रेत्यांना जागा दिल्यानंतरही जागा उरत असल्यास इतरांना संधी देण्यास हरकत नाही. मात्र स्थानिक परवानाधारक फेरीविक्रेत्यांना प्रवेश न देता इतरांना संधी दिल्यास त्या जागेमध्ये बसविलेल्या बाहेरील फेरीविक्रेत्यांना हाताला धरून बाहेर काढले  जाईल व त्या ठिकाणी स्थानिक भागातील परवानाधारक फेरीविक्रेत्यांना व्यवसायासाठी बसविले  जाईल. यातून गोंधळ निर्माण  झाल्यास अथवा कायदा  व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार राहील असा इशारा गणेश भगत यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago