Categories: Uncategorized

सोसायटी आवारातील कोरोना रूग्णांची माहिती सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना कळविण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही

Navimumbailive.com@gmail.com : ९८२००९६५७३

नवी मुंबई :  नवी मुंबई : गृहनिर्माण  सोसायटीच्या आवारात कोणी कोरोना रूग्ण आढळल्यास गृहनिर्माण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना पूर्वीप्रमाणेच मोबाईलवरून माहिती देण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे. अशोक गावडे यांनी यापूर्वी १९ सप्टेंबर २०२० रोजी महापालिका आयुक्तांना याच विषयावर निवेदन सादर केले होते. ३० सप्टेंबर २०२०  रोजी अशोक गावडे यांनी पुन्हा एकवार याच विषयावर महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना निवेदन देवून समस्येचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे.

महापालिका प्रशासन पूर्वी गृहनिर्माण  सोसायटीच्या आवारात कोरोना रूग्ण आढळून आल्यास सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर माहिती पाठवून कळवत असे. त्यामुळे सोसायटी  आवारातील पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सोसायटीतील रहीवाशांना कोरोना  रूग्णांबाबत माहिती उपलब्ध होवून सर्व रहीवाशी  काळजी घेत असत. मात्र  गेल्या काही दिवसापासून महापालिका प्रशासनाने सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना माहिती पाठविणे बंद केले आहे. त्यामुळे नवी  मुंबई शहरातील गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात गंभीर समस्या  निर्माण झाली असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी निवेदनातून पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून  देण्याचा प्रयत्न केला आहे.

डॉक्टरांना आम्ही होम क्वारन्टाईन होतो असे सांगून रूग्ण घरी थांबणार असल्याची पालिका प्रशासनाला  कल्पना देतात. मात्र आपल्या गृहनिर्माणस  सोसायटी आवारात कोणाला कोरोना  झाला आहे, याबाबत सोसायटीच्या रहीवाशांना  व पदाधिकाऱ्यांना कल्पना नसते. कोरोना रूग्ण खरोखरीच होम क्वारन्टाईन झाला  आहे अथवा  नाही, त्याच्या घरातील उर्वरित लोकांनी कोरोना चाचणी करून  घेतली आहे अथवा  नाही याबाबत पालिका प्रशासन  कोणतीही खातरजमा  करत नाही. त्यामुळे अनेक  भागात कोरोनाग्रस्त होम क्वारन्टाईन झाल्यावर अनेकदा कंटाळा आल्यावर सोसायटी आवारात तसेच परिसरात फिरत असतात. एकप्रकारे ते कोरोना संक्रमणाचे काम करतात.  सोसायटी आवारात कोणाला कोरोना झाला आहे,  याबाबत कोणालाही माहिती नसल्याने रहीवाशांना प्रतिबंधात्मक काळजीही घेता येत नाही, त्यामुळे परिस्थिती  अवघड होवून  बसली आहे.  महापालिका प्रशासनाने पूर्वीप्रमाणेच सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना  सोसायटी आवारातील कोरोना  रूग्णांविषयी माहिती उपलब्ध करून द्यावी.  जेणेकरून कोरोना रूग्णांची माहिती होईल,  इतरांना माहिती पडल्यामुळे कोरोना  रूग्ण खऱ्या अर्थाने होम  क्वारन्टाईन होईल व इतरांनाही त्यापासून धोका निर्माण होणार नाही. त्यामुळे कोरोनाबाबतच्या समस्येचे गांभीर्य पाहता तात्काळ संबंधितांना पूर्वीप्रमाणेच सोसायटीच्या  पदाधिकाऱ्यांना कोरोना रूग्णांविषयी मोबाईलवर माहिती देण्याचे निर्देश देण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी महापालिकेकडे केली आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago