Categories: Uncategorized

सानपाड्यात पांडुरंग आमलेंच्या माध्यमातून प्रभाग ७६ मध्ये कमळ फुलणार!

नवी मुंबई : महानगरपालिकेची सहावी सार्वत्रिक निवडणूक कोरोनामुळे जवळपास वर्षभर लांबणीवर पडली आहे. त्यातच आता महापालिका निवडणूकांचे पडघम  वाजू लागल्याने व कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागून निवडणूक कार्यक्रम लागण्याची शक्यता राजकारणात वर्तविली जात आहे. सानपाडा नोड हा शिवसेनेचा, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा व त्यापाठोपाठ कॉंग्रेसचा  बालेकिल्ला मानला जात असतानाच यंदाच्या निवडणूकीत प्रभाग ७६ मध्ये पांडुरंग आमलेंच्या माध्यमातून सानपाडा नोडमध्ये प्रथमच भाजपाचे कमळ फुलणार असल्याची चर्चा सानपाडा नोडमधील राजकारणात सुरू झाली आहे.

या प्रभाग ७६  मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे  बोऱ्हाडे नगरसेवक असून गेल्या काही वर्षापासून या प्रभागावर बोऱ्हाडे परिवाराचे वर्चस्व राहिलेले आहे. दिलीप  बोऱ्हाडे हे सुरूवातीला शिवसेना  व त्यानंतर राष्ट्रवादी कॉग्रेस असा प्रवास करत असले तरी प्रभागातील जनतेने त्यांची पाठराखण  केलेली आहे. मागील वर्षभराच्या काळात  आपल्या जनकल्याणकारी कामाच्या पाठबळावर भाजपाच्या पांडुरंग आमले यांनी जनसामान्यांमध्ये चांगलीच मुसंडी मारलेली आहे. कोरोना काळात  प्रभाग ७६ आणि आजूबाजूच्या परिसरात पांडुरंग आमले यांनी केलेले कार्य भाजपासाठी पालिका निवडणूकीत फायदेशीर ठरणार  आहे.

कोरोना काळात पांडुरंग आमले यांनी केलेले कार्य, दीड वर्षात सातत्याने राबविलेले उपक्रम, स्थानिक उमेदवार व  प्रभागातील मतदारयादीत नाव, शिवाय पांडुरंग आमले यांचे सर्वच  कुटूंब भाजपात या सर्व बाबी पांडुरंग आमले यांच्या पथ्यावर पडणार असून बेलापुरच्या भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचे निकटचे कडवट समर्थक  अशी पांडुरंग आमले यांची प्रतिमा आहे. १९९५ पासून झालेल्या पाचही सार्वत्रिक निवडणूकांमध्ये सानपाडा नोडमध्ये भाजपचे कमळ अद्यापि फुलले नसले तरी यंदा मात्र पांडुरंग आमलेंच्या माध्यमातून प्रभाग ७६ मध्ये भाजपचे कमळ फुलणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago