Categories: Uncategorized

साडे बारा टक्केच्या इमारतीच्या संरक्षक भिंतीची रंगरंगोटी करून त्यावर समाजप्रबोधनात्मक सुभाषिते प्रकाशित करा : मनोज मेहेर

नवी मुंबई : प्रभाग ८६ मधील सारसोळे गाव तसेच नेरूळ सेक्टर सहा परिसरातील बाहेरील व अंर्तगत भागातील गृहनिर्माण सोसायटीच्या संरक्षक भिंतीची रंगरंगोटीकरून त्यावर समाजप्रबोधनात्मक सुभाषिते प्रकाशित करण्याची लेखी मागणी सारसोळे गावचे युवा  ग्रामस्थ आणि महापालिका ‘ब’ प्रभाग समितीचे माजी सदस्य मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर आणि नेरूळ विभाग अधिकारी दत्तात्रेय नांगरे यांच्याकडे केली आहे.

महापालिका प्रभाग ८६ मध्ये सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहा परिसराचा समावेश होत आहे. स्वच्छ भारत अभियानातंर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२०-२०२१ उपक्रमामध्ये नवी मुंबई शहरात सर्वत्र इमारतींची रंगरंगोटी व त्यावर चित्रे तसेच सुभाषिते रंगविली जात आहे. या अनुषंगाने प्रभाग ८६ मध्ये असलेल्या अंर्तगत भागातील व मुख्य रस्त्यावरील इमारतींच्या संरक्षक भिंतीची रंगरंगोटी प्राधान्याने होणे आवश्यक आहे. आजवर अनेकदा शहरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील इमारतींच्या संरक्षक भिंतीची रंगरंगोटी होवून त्यावर चित्रे काढण्यात आली. सुभाषिते काढण्यात आली. परंतु नेरूळ सेक्टर सहामधील साडे बारा टक्केच्या इमारतींच्या संरक्षक भिंतीची आजवर एकदाही रंगरंगोटी करण्यात आलेली नाही. चित्रेही काढण्यात आली नाही. सुभाषिते रंगविण्यात आलेली नाहीत. प्रभाग ८६ मधील साडेबारा टक्केच्या इमारतींच्या संरक्षक भिंतीची रंगरंगोटी का होत नाही. आमचा परिसर स्वच्छ भारत अभियानात मोडत नाही काय? केवळ बाहेरील भागात रंगरंगोटी होते व आतील भागात बकालपणा कायम तसाच असतो. हे चित्र  किती वर्ष पाहायचे? स्वच्छ भारत अभियानामध्ये नेरूळ सेक्टर सहामधील व सारसोळे गावातील साडे बारा टक्केच्या इमारती  व अन्य इमारतीच्या संरक्षक भिंतीची रंगरंगोटी करण्याचे, त्यावर चित्रे काढण्याचे व  सुभाषिते रंगविण्याचे संबंधितांना तातडीने आदेश देण्याची मागणी मनोज यशवंत मेहेर  यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago