Categories: Uncategorized

साईश्रध्दा सोसायटीमागील भुखंड क्रं २०५ वरील पडीक इमारत परिसराची सफाई करण्याची गणेश भगत यांची मागणी

नवी मुंबई : प्रभाग ९६ मध्ये नेरूळ सेक्टर १६ ए मध्ये साईश्रध्दा सोसायटीमागील भुखंड क्रं २०५ वरील पडीक इमारत परिसराची सफाई करण्याची मागणी जनसेवक गणेश भगत यांनी लेखी निवेदनातून महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

नेरूळ नोडमध्ये प्रभाग ९६ मध्ये नेरूळ सेक्टर १६ ए मध्ये साईश्रध्दा ही गृहनिर्माण सोसायटी आहे. या सोसायटीच्या पाठीमागील बाजूस भुखंड क्रं २०५ वर पडीक इमारत आहे. या पडीक इमारतीच्या सभोवताली जंगली झुडूपे, जंगली गवत, रॅबिट व डेब्रिज पडलेले आहे. या पडीक इमारतीमुळे सभोवतालच्या सोसायटीतील रहीवाशांना त्रास होत असून त्यांच्या जिवितास धोका निर्माण झालेला आहे. या पडीक इमारतीमुळे रहीवाशांना डासांचा त्रास होत असून साथीच्या आजाराचाही सामना करावा लागत आहे. या पडीक इमारतीमुळे साप, नाग व अन्य सरपटणाऱ्या प्राण्यांचाही उद्रेक वाढीस  लागला आहे. शेजारच्या गृहनिर्माण सोसायटीतील सदनिकांमध्ये साप व नाग येवू लागल्याने रहीवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्या सोसायटीतील रहीवाशांनी माझ्याकडे त्यांना जाणवणाऱ्या त्रासाबाबत लेखी निवेदनही सादर केले आहे. आपण या पडीक इमारतीच्या सभोवताली असणाऱ्या सर्व परिसराची सफाई करून स्थानिक रहीवाशांची त्रासातून मुक्तता करावी. येथे सफाई झाल्यास परिसराचा बकालपणा संपुष्ठात येईल व स्वच्छता अभियानालाही हातभार लागेल. या परिसराची लवकरात लवकर सफाई करण्याची मागणी जनसेवक गणेश भगत यांनी केली आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago