Categories: Uncategorized

शैक्षणिक सहलीच्या नावाखाली जनतेच्या पैशाची उधळपट्टी – मनविसेचा आरोप

नवी मुंबईतील करदात्यांचे ४०ते५०लाख शिक्षण विभागाने घातले इमॅजिका वाटरपार्कच्या पाण्यात ! !

नवी मुंबई : विद्यार्थ्यांना सांस्कृतिक, ऐतिहासिक, शैक्षणिक गोष्टींचे ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी  दरवर्षी शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते,परंतु नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाला या सर्व गोष्टींचा विसर पडला असून मौजमजेसाठी शैक्षणिक सहलींचे आयोजन केले असून त्यासाठी नागरिकांच्या करातील ४०ते५० लाखांचा चुराडा शिक्षण विभागाने केल्याचा धक्कादायक प्रकार मनविसेचे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी उजेडात आणला आहे. दरवर्षी महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या वार्षिक शैक्षणिक सहलीच्या आयोजनासाठी कारदात्यांच्या पैशातून राखीव निधीची तरतूद करण्यात येते.परंतु यावर्षी कुठल्याही ऐतिहासिक, शैक्षणिक ठिकाणी सहल न नेता पालिकेच्या माध्यमिक  शाळेतील  विद्यार्थ्यांना खोपोली येथील  इमॅजिका वॉटरपार्क येथे सहलीसाठी नेण्यात आले.गंभीर बाब म्हणजे मौजमजेच्या ठिकाणी सहलीसाठी ४० ते ५० लाखांचा खर्च करण्यात आला असून या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी  मनविसे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.दिनांक ०३-०२-२०२० ते ०६-०२-२०२० या कालावधीत नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील इयत्ता ९  व  १० वीच्या जवळपास ५००० विद्यार्थ्यांची सहल इमॅजिका वॉटरपार्क येथे आयोजित करण्यात आली होती.तसेच या सहलीचा आनंद पालिकेतील काही शिक्षक व मुख्याध्यापकांच्या कुटुंबीयांनीही लुटला असल्याचे समोर आले आहे.  तसेच या सहलीच्या आयोजनात शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांचे आर्थिक लागेबांधे असल्याचा आरोप उपशहर अध्यक्ष संदेश डोंगरे यांनी केला आहे.सदरचे प्रकरण गंभीर असून मौजमजेच्या ठिकाणी सहल आयोजित करून  नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि या गैरप्रकारांत दोषी  असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात  यावे अशी मागणी शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, सनप्रीत तुर्मेकर, निखिल गावडे यांनी केली आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago