Categories: Uncategorized

शिवसेनेचे माजी नगरसेवक सतीश रामाणेंचा वाढदिवस उत्साहात साजरा

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : ‘जिवाभावाचे मित्र’ या सोशल मिडियावर नावाजलेल्या व्हॉट्सअप ग्रुपकडून सारसोळे गावामध्ये शिवसेनेचे माजी कार्यसम्राट नगरसेवक सतीश रामाणे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख व नवी मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते दिलीपभाऊ घोडेकर, शिवसेना नवी मुंबई शहरप्रमुख विजय माने, शिवसेनेचे माजी नगरसेवक, माजी पालिका पक्षप्रतोद व शिवसेना विभागप्रमुख  रतन मांडवे, भाजपचे रवींद्र भगत, महापालिकेचे माजी ब प्रभाग समिती सदस्य मनोज मेहेर, मनसेचे गणेश पालवे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुकाध्यक्ष महादेव पवार, उद्योजक प्रकाशशेठ गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील, मकरंद वैती यांच्यासह अन्य उपस्थित होते. यावेळी रतन मांडवे यांनी प्रास्तविकपर भाषणातून रामाणेंसोबत महापालिका सभागृहात घालविलेल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. विजय माने व दिलीपभाऊ घोडेकर यांनीही आपल्या भाषणातून रामाणेंना शुभेच्छा दिल्या. रतन मांडवेंनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मानले.  यावेळी सतीश रामाणे  यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात येवून उपस्थितांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. सारसोळे गावातील कै. बुध्या बाळ्या वैती मार्गावरील वैष्णवी बिल्डींगच्या समोर हा कार्यक्रम झाला. विशेष म्हणजे हे सर्व राजकीय घटक ‘जिवाभावाचे मित्र’ या व्हॉटसग्रुपचे सदस्य असून ग्रुपवर सातत्याने हे घटक एकमेकांशी सतत भांडत असले तरी प्रत्याक्षात मात्र या सर्वाची राजकारणविरहीत मैत्री असल्याचे रामाणे यांच्या वाढदिवसानिमित्ताने पहावयास मिळाले.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago