Categories: Uncategorized

शिवनेरीसह परिमल सोसायटीच्या मल:निस्सारण वाहिन्या बदली करण्याचा शुभारंभ

स्थानिक रहीवाशांनी केला मा. नगरसेविका  रूपाली भगतसह जनसेवक गणेश भगतांचा सत्कार

नवी मुंबई : नेरुळ नोडमधील महापालिका  प्रभाग ९६ मधील सेक्टर १६ए मधील शिवनेरी व परिमल  या दोन गृहनिर्माण सोसायट्यांच्या मल:निस्सारण वाहिन्या बदली करण्याच्या कामाचा शुभारंभ माजी नगरसेविका रूपाली भगत आणि जनसेवक गणेश भगत यांच्या हस्ते झाला.

या सोसायटीत मल:निस्सारण वाहिन्या बदलण्याचे काम गेली अनेक वर्षे रखडले होते. अनेक राजकारण्यांनी त्यांना त्या त्या वेळी आश्वासनेच दिली. पण काम कोणी पूर्णत्वास नेले नाही. तत्कालीन नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी महापालिका प्रशासनाकडे तर जनसेवक गणेश भगत यांनी लोकनेते गणेश नाईकांकडे पाठपुरावा करून ही समस्या मार्गी लावल्याचे समाधान आज उद्घाटनप्रसंगी स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त करण्यात येत होते. यावेळी दोन्ही गृहनिर्माण सोसायटीतील रहीवाशांनी मल:निस्सारण वाहिनी बदलण्याच्या कामास सुरूवात झाल्याबद्दल माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत व जनसेवक गणेश भगत यांचा सत्कार केला. यावेळी समाजसेवक संजय पाथरे, पांडुरंग बेलापुरकर, आर. एम. पाटील, दत्तात्रेय माने, निवृत्ती इंगवले, सुरेश धुरी, वेंकट जाधव, मनजीत सिंग, सय्यद सुलतान, नामदेव अवघडे, आर बी सिंग, चंद्रकांत देशमुख, सुधाकर सोनावणे, रविंद्र भगत यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago
magbo system