Categories: Uncategorized

शशिकांत शिंदेंच्या विधान परिषदेसाठी समर्थकांकडून सोशल मिडियावर जोरदार लॉबिंग सुरू

भास्कर जाधव : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : विधान परिषदेच्या निवडणूकीचे पडघम वाजू लागताच विधानसभा निवडणूकीत पराभूत झालेल्या नेतेमंडळींना तसेच पक्षसंघटनेत अडगळीत पडलेल्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा आमदारकीचे पर्यायाने पुनर्वसनाचे वेध लागू लागतात. अनेकदा नेतेमंडळींना इच्छा अथवा महत्वाकांक्षा नसली तरी समर्थक व कार्यकर्ते आपल्या नेत्यावरील आपले प्रेम दाखविण्यासाठी सोशल मिडियावरून आपल्या नेत्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू करतात. कधी ती लॉबिंग नेत्यांना फायदेशीर ठरते तर कधी नेत्यांना गळफासही नसते. सध्या नवी मुंबई कार्यक्षेत्रातील सोशल मिडियावर माथाडी नेते, माजी आमदार, माजी राज्यमंत्री व मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीचे सुप्रिमो शरद पवार यांनी शिंदेंना विधान परिषद द्यावी म्हणून सोशल मिडियावर गेल्या ४८ तासापासून जोरदार लॉबिंग सुरू केले आहे.

विधानसभा निवडणूकीत पराभूत झाल्यावर राज्यातील राजकारणात शशिकांत शिंदे हे स्पर्धेच्या राजकारणात बऱ्याच लांबवर फेकले गेले आहेत. बाजार समितीवर माथाडी-मापाडी गटातून त्यांची संचालक म्हणून वर्णी लागल्यावर सहकारातील त्यांचे वजन आजही कायम असल्याचे त्यांनी सिध्द केले आहे. नवी मुंबई कार्यक्षेत्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांच्या खांद्याला खांदा लावून शशिकांत शिंदे व त्यांचे पुत्र तेजस शिंदे राष्ट्रवादी कॉंग्रेसची धुरा सांभाळत आहेत. नाईक भाजपमय झाल्यावर खिंडार पडलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला नवसंजीवनी देण्याचे काम व कार्यकर्त्यामध्ये उत्साह निर्माण करण्याचे काम गावडे व शिंदे पितापुत्र या त्रिमूर्तीने खऱ्या अर्थाने केले आहे.

पश्चिम महाराष्ट्रासोबतच सध्या नवी मुंबईतही राष्ट्रवादीची संघटनात्मक जबाबदारी शशिकांत शिंदे सक्षमपणे सांभाळत आहेत. एकेकाळी महापालिकेत सत्ताधारी असणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला नवी मुंबई महापालिका निवडणूकीच्या माध्यमातून पुन्हा मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी शशिकांत शिंदेंना प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागणार आहे. त्यातच घणसोली नोडमधून रूषीकांत शिंदे आपल्या मुलाला पालिका निवडणूक रिंगणात उतरविणार असल्याच्या चर्चा जोरदार सुरू झाल्याने घणसोली नोडमधील माथाडी प्रवाहात उत्साहाचे वारे संचारले आहे. हा उत्साह राष्ट्रवादीला व माथाडी चळवळीला बळकटी देण्यास मदत करेल अशी चर्चा नवी मुंबईत सुरू आहे. त्यातच माथाडींचे श्रध्दास्थान असणारे अण्णासाहेब पाटील यांच्या परिवाराने आनंदराव पाटिल, भारती पाटील, रवी पाटील यांनी महापालिका सभागृहात कोपरखैराणेतील माथाडींचे प्रतिनिधी म्हणून काम पाहिले आहे. नवी मुंबईत नेरूळ हा नागरीकरणासाठी महत्वपूर्ण नोड मानला जात आहे. त्यातच या नोडमध्ये तसेच सभोवतालच्या जुईनगर व सिवूड्स भागात पश्चिम महाराष्ट्रातील लोकसंख्या जास्त असल्याने महापालिका पुनर्रचनेत आरक्षणात खुला असलेल्या शशिकांत शिंदे यांचा निवासी प्रभाग असलेल्या प्रभाग ८५ मधून तेजस शिंदेंना उमेदवारी देण्यासाठी लोकांमधूनच शशिकांत शिंदेवर कमालीचा दबाव वाढू लागला आहे. नेरूळ नोडमधून प्रथमच महापालिका सभागृहात माथाडी टक्क्याला प्राधान्य मिळेल आणि स्वत: तेजस शिंदे निवडणूकीत उतरल्यास राष्ट्रवादीमधील युवा कार्यकर्त्यांनाही ताकद मिळेल. त्यामुळे अखेरच्या क्षणी कार्यकर्त्यांच्या व पश्चिम महाराष्ट्रातील लोकांच्या दबावामुळे तेजस शिंदेंना प्रभाग ८५ मधून राष्ट्रवादी कॉंग्रेस निवडणूक रिंगणात उतरवणार असल्याचे बोलले जात आहे.

शशिकांत शिंदेंना पक्षाने विधान परिषदेवर संधी द्यावी म्हणून त्यांच्या समर्थकांकडून सोशल मिडियावरून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. या मोर्चेबांधणीची सर्वत्र चर्चा असून सोशल मिडियावरील लॉबिंगची पक्ष कितपत गंभीरपणे दखल घेतो ते लवकरच पहावयास मिळणार आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

4 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

4 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

4 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

4 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

4 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

4 years ago