Categories: Uncategorized

विमानतळास दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची दुर्गा फांऊडेशनची मागणी

नवी मुंबई : कुळ कायद्याचे जनक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व नारायण नागु पाटील यांनी देशात पुकारलेल्या आंदोलनामुळे १९५७-६० या काळात कष्टकरी गरीब शेतकऱ्यांना ‘कसेल त्याची जमीन’ या कुळकायद्यानुसार जमिनीचा हक्क मिळवून दिला होता.

नवी मुंबईतीलआगरी, कोळी,कराडी,कुणबी व आदिवासी या समाजाचे शेती व मासेमारी हेच पारंपरिक व्यवसाय होते.कुळ कायद्यानुसार मिळालेल्या हक्काच्या जमिनी १९७० च्या दशकात शासनाने सिडकोमार्फत कवडीमोलाच्या बाजारभावाने संपादीत केल्या त्यामुळे नवीमुंबईतील प्रकल्पग्रस्त भूमिहीन झाले,पर्यायाने प्रकल्पग्रस्ताचे रोजगार,व्यवसाय,उत्पन्नाचे साधन नष्ट झाले.

शासनाने सिडकोमार्फत प्रकल्पग्रस्ताना देशोधडीला लावले असताना नवी मुंबईतून तत्कालीन खासदार दि.बा.पाटील यांच्या सक्षम नेतृत्वाखाली  पुकारलेल्या आंदोलनाची व या आंदोलनात शेतकऱ्यांनी दिलेल्या बलिदानाची शासनाने गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्यात विकास योजना राबविण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला.

प्रकल्पग्रस्ताना न्याय मिळवून देण्यासाठी खासदार दि.बा. पाटील यांचे मोठे योगदान असल्यामुळे त्यांना प्रकल्पग्रस्ताचे कैवारी म्हणून संबोधले जाते.

नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्ताच्या संपादित जमिनीवर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात आलेल्या विमानतळास ‘दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव देण्यात यावे अशी मागणी दुर्गा फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा शोभाताई भोईर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्ताच्या संपादित जमिनीवर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात आलेल्या विमानतळास ‘दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव देण्यात यावे अशी मागणी दुर्गा फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा शोभाताई भोईर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

4 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

4 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

4 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

4 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

4 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

4 years ago