Categories: Uncategorized

वाढीव वीज बिले रद्द करा : गणेश नाईक

नवी मुंबई : महावितरणने वाढीव वीजबिलांचा शॉक दिल्याने नागरिक अडचणीत सापडले आहेत. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ५०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे आश्वासन पाळले नाही. लॉकडाऊनच्या कालावधीत जवळपास सर्वच उद्योग, व्यवसाय बंद असल्याने नागरिकांवर आर्थिक संकट ओढवलेले आहे. त्यामुळे नागरिकांची वाढीव वीजबिले रद्द करून त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी नवी मुंबईचे शिल्पकार, ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व ऐरोली मतदारसंघाचे आमदार लोकनेते गणेश नाईक यांनी केली आहे.

राज्यात वाढीव वीज बिलांचा मुद्दा चर्चेचा विषय आहे. या वाढीव विजबिलांविरोधात भाजपने नवी मुंबईत आंदोलन छेडले आहे. भाजप आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ५०० युनिट पर्यंतची वीज बिले माफ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता नागरिकांची वीजबीले माफ करण्याचे तर दुरच उलट त्यांच्या वीज वापरापेक्षा जास्त बिले आली आहेत. त्यामुळे गणेश नाईक यांनी वीजमंत्र्यावर टीका करत वीजबिले रद्द करण्याची मागणी केली आहे. वीजबिले रद्द न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा नाईकांनी दिला आहे.

लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यानंतर कोणत्याही प्रकारचे रीडिंग न देता ग्राहकांना सरसकट वीज बिले दिली गेली. बंद केलेली घरे, कित्येक दिवसापासून बंद असलेली दुकाने यांनाही वाढीव विजेची बिले मिळाली आहेत. त्यामुळे अगोदरच आर्थिक संकटात असलेले नागरिक आणखी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे राज्य शासनाने त्वरित या प्रकरणाकडे लक्ष द्यावे व लोकांना दिलासा द्यावा, असेही नाईक यांनी म्हटले आहे.

यावेळी गणेश नाईकांसोबत माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व माजी नगरसेवक मोठ्या संख्येने हजर होते.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago