Categories: Uncategorized

रेल्वे प्रवासाच्या माध्यमातून सविनय कायदेभंग आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांची सुटका

निलेश बाणखिलेंसह मनसैनिकांचा घोषणाबाजीच्या गजरात रबाळे ते कोपरखैरणे रेल्वे प्रवास 

नवी मुंबई : जनजीवन सुरळीत करण्यासाठी  यासाठी रेल्वे सेवा सुरू करण्यात यावी यासाठी मनसेचे नवी मुंबई उपशहर अध्यक्ष निलेश बाणखिलेंसह मनसैनिकांनी रेल्वे प्रवासाच्या माध्यमातून सविनय कायदेभंग  आंदोलन केले. निलेश बाणखिलेंसह मनसैनिकांचा घोषणाबाजीच्या गजरात रबाळे ते कोपरखैरणे रेल्वे प्रवास केला. रबाळे पोलिसांनी या मनसैनिकांना अटक केली खरी, पण काही वेळाने पोलिसांनी या मनसैनिकांची सुटका केली. नवी मुंबई शहरात निलेश बाणखिले व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या रेल्वे प्रवासाचीच चर्चा सुरू होती.

मुंबईची लाईफलाईन अर्थातच मुंबई लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रेल्वे प्रवासाच्या माध्यमातून उतरली.  मनसेचे संदीप देशपांडे, गजानन काळे  मुंबईत रेल्वे प्रवास  करत असताना नवी मुंबईतील मनसेचे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले यांनी सविनय कायदेभंग आंदोलन करत सोमवारी सकाळी रबाळे ते कोपरखैरणे रेल्वे प्रवास करताना नवी मुंबईकरांच्या सेवेसाठी रेल्वे सेवा  सुरू करण्याची मागणी केली. या निलेश बाणखिले व  त्यांच्या  सहकारी मनसैनिकांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रबाळे रेल्वे स्थानकाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.  

मुंबईत केवळ अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांसाठीच लोकलच्या प्रवासाची मुभा रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आल्याने बस आणि एसटी वाहतुकीवर कमालीचा ताण पडत आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून या पार्श्वभूमीवर मनसेच्या संदीप देशपांडेंनी मुंबईत व गजानन काळे यांनी नवी मुंबईतून सर्वसामान्यांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी म्हणून सविनय कायदेभंग आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील मनसेचे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी रबाळे रेल्वे स्थानकात जाऊन घोषणाबाजी करत ट्रान्स हार्बर मार्गावरील  रबाले ते कोपरखैराणे असा रेल्वे प्रवास करून नवी मुंबईकरांच्या सेवेसाठी रेल्वे सेवा सुरु करण्याची मागणी केली आहे. 

यावेळी सविनय कायदेभंग आंदोलनाविषयी माहिती देताना नवी मुंबईतील मनसेचे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले यांनी यावेळी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सर्व सामान्य लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे, त्यांना रोजगार उरला नाही. कामावर जाण्याकरिता प्रवाशांना बसच्या प्रचंड गर्दीतून आठ तास प्रवास करावा लागत आहे. बस आणि एसटीतील या गर्दीमुळे कोरोना होत नाही का? बसमधून कोरोना होत नाही आणि रेल्वेने प्रवास केला तर कोरोना होतो? असा खोचक प्रश्न विचारात सामान्य माणसाला रेल्वेचा प्रवास सुरळीत करून देण्याची विनंतीसुद्धा बाणखेले यांनी रेल्वे प्रशासनाला केली आहे. यावेळी निलेश बाणखेले यांना व त्यांच्या सहकारी मनसैनिकांना रबाळे पोलिसांनी अटक करून काही वेळाने सोडून दिले.

NaviMumbaiLiveStaff

Recent Posts

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

  संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोनाचा स्फोट होणार ही भीती गेल्या…

3 years ago

पनवेल महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  आकृतिबंध संदर्भात विधिमंडळातही उठवला होता आवाज   पनवेल :…

3 years ago

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; काँग्रेसची विनंती. मुंबई…

3 years ago

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

नवी मुंबई : सानपाडा नोडमधील महापालिका प्रभाग ७६ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अॅण्टीजेन टेस्ट…

3 years ago

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो :Navimumbailive.com@gmail.com पनवेल :  भाजपचे नगरसेवक तथा…

3 years ago

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा…

3 years ago